ताज्या बातम्यासामाजिक

मेंढपाळ महिलेला अमानुष मारहाण, महिला पोलीस उपअधीक्षक सई भोर पाटील यांच्या कारवाईकडे पीडित महिलेचे लक्ष….

माळशिरस (बारामती झटका)

रेडे ता. माळशिरस येथील बायडाबाई विठ्ठल शेंडगे यांना कळकाच्या काठीने मांडीवर व हाताने तोंडावर नाकावर तसेच डोक्यात अमानुष मारहाण अर्जुन तुकाराम शेंडगे रा. रेडे यांनी केलेली आहे. अकलूज उपविभागीय अधिकारी महिला पोलीस अधीक्षक सई भोर पाटील आहेत. महिलेला मारहाण केलेली असल्याने सई भोर पाटील यांच्या कारवाईकडे पीडित महिलेचे लक्ष लागलेले आहे. सदरच्या घटनेचा नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे. भारतीय दंड संहिता 1960 कलम 324, 323, 504, 506 कलमे लावलेली आहेत.

फिर्यादी बायडाबाई विठ्ठल शेंडगे (वय 40) वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादी जबाबामध्ये, पती विठ्ठल बापू शेंडगे, मुलगा संजय व विकास असे आमचे कुटुंब असून आम्ही शेती करून उपजीविका करतो‌ तसेच उपजीविकेकरता शेळ्या, मेंढरे आहेत व दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असतात. दि. 25/08/2023 रोजी पती व विकास घरी शेतातील पाणी देण्यासाठी थांबलेले होते. म्हणून मी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेळ्या, मेंढ्या घेऊन आमचे घरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात चारण्यासाठी गेले होते. तेथून सायंकाळी साडेचार वाजण्याचे सुमारस घराकडे येत असताना डोंगराच्या पायथ्याशी अर्जुन तुकाराम शेंडगे हा त्यांची मेंढरे घेऊन चालत होते. त्यांनी मला पाहून तुमची शेळ्या, मेंढरे येथे चारण्यासाठी का घेवून आलात. तुमची येथे जमीन नाही, तुमचा येथे येण्याचा काय संबंध?, असे म्हणून मला शिवीगाळ करून दमदाटी करू लागला. मी त्यांना ही जमीन सरकारची आहे, तुमची नाही असे म्हणले. तू मला उलटी बोलती काय असे म्हणून त्यांनी माझ्या शेळ्या, मेंढरे हुसकावून लावून हातातील कळकाच्या काठीने डाव्या पायाच्या मांडीवर व हाताने तोंडावर, नाकावर, डोक्यात मारहाण केल्याने नाकाचा घोणाळा फुटला. त्यावेळी माझ्या नाकातून रक्त आलेले पाहून तो तेथून मेंढरे घेऊन निघून गेला. त्यावेळी तेथे इतर कोणीही नव्हते. त्यानंतर मी शेळ्या, मेंढरे घेऊन घरी आले व झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत पती यांचे सोबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असता पोलिसांनी मला उपचाराकरता सरकारी दवाखाना येथील मेडिकल यादी दिलेले सरकारी दवाखाना येथे जाऊन उपचार करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अर्जुन तुकाराम शेंडगे यांच्या विरोधी तक्रार आहे, अशी तक्रार दिलेली आहे.

घडलेला प्रकार जळभावी 137 गट नंबर राखीव वन विभागाचा आहे. सदरचा गट बामनदारा म्हणून सुप्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात डोंगरदऱ्या आहेत. सदरची वन विभागाची जमीन आहे. वनरक्षक के. डब्ल्यू. शेख आहेत. खऱ्या अर्थाने वनविभागाच्या जमिनीवर लक्ष देण्याची अधिकाऱ्यांची गरज आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे महिलेला अमानुष मारहाण झालेली आहे. जर कोणालाच मेंढरे चारण्यासाठी अटकाव केला असता तर अर्जुन तुकाराम शेंडगे यांनी बायडाबाई शेंडगे यांना तू जमिनीत शेळ्या मेंढरे चालण्यासाठी का आली, असा प्रश्न उपस्थित केला नसता. वन विभागाची जमीन असताना अर्जुन तुकाराम शेंडगे यांनी स्वतःची मालकी सांगत महिलेला अमानुष मारहाण केलेली आहे. योगायोगाने अकलूज उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक सई भोर पाटील आहेत. त्यांच्याकडून योग्य ती कारवाई होईल, असा विश्वास बायडाबाई शेंडगे यांच्या नातेवाईकांना आहे. आरोपी तुकाराम शेंडगे यांना अद्यापपर्यंत अटक केलेली आहे किंवा नाही, असाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort