ताज्या बातम्यासामाजिक

वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे, वनपाल धनंजय देवकर, वन अधिकारी संजय लडकत यांच्यावर कायदेशीर कारवाई करा – जनार्दन बरडकर

फॉरेस्ट जमिनीवर बेकायदेशीररित्या उत्खनन करून फॉरेस्ट हद्दीतून बेकायदेशीर विहिरी, पाईपलाईन याला जबाबदार संबंधित अधिकारी आहेत…

नातेपुते (बारामती झटका)

मौजे नातेपुते ता. माळशिरस, हद्दीतील फॉरेस्ट जमिनीवर बेकायदेशीररित्या उत्खनन करून गट नंबर 242536, 640645 मधून फॉरेस्ट हद्दीतून बेकायदेशीर विहिरी पाडून पाईपलाईन नेल्या आहेत. याला जबाबदार संबंधित अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस दयानंद कोकरे, वनपाल नातेपुते धनंजय सुभाष देवकर, वन अधिकारी नातेपुते संजय लडकत यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अर्जातील पुढील लोकांची संगणमत करून यांनी लोणंद व नातेपुते येथील वन विभागातून बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून पाईपलाईन केले बाबतचा तक्रारी अर्ज उपवनसंरक्षक वन विभाग सोलापूर यांच्याकडे श्री. जनार्दन नाना बरडकर रा. नातेपुते यांनी केलेला असून सदरच्या अर्जाची प्रत वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस यांचे कार्यालयात देण्यात आलेली आहे.

सदरच्या दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये मौजे नातेपुते, ता. माळशिरस येथील कायम रहिवासी असून मौजे लोणंद व नातेपुते हद्दीत आपले वन विभागाचे क्षेत्र आहे. आपले लोणंद येथील वन विभागातर्फे अमोल उर्फ बारक्या जय रत्न जाधव याने गार्ड असल्याचे बसवून श्री. हनुमंत ब्रह्मचारी रुपनवर, श्री. धनंजय सुभाष देवकर व श्री. हनुमंत तुकाराम खताळ यांच्याशी संगणमत करून नातेपुते हद्दीत मेन कॅनलच्या शेजारी दोन मोरी व म्हसोबा शेजारील भरावा येथील फॉरेस्टमध्ये मौजे नातेपुते येथील गट नंबर 242 मध्ये अनाधिकृत एकूण पाच विहिरी व पाच एकर अंदाजे जमीन वहिवाट करीत आहेत. त्यात बेकायदेशीररित्या वहिवाट करणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – श्री. हनुमंत ब्रह्मचारी रुपनवर, श्री. हनुमंत तुकाराम खताळ, श्री. सुनील मारुती खताळ, श्री. संतोष बापूराव रुपनवर, श्री. नितीन तानाजी रुपनवर, श्री. दत्तात्रेय तानाजी रुपनवर, श्री. अनिल उर्फ आनंदराव हनुमंत रुपनवर, श्री. दादा महादेव खताळ यांच्या विहिरी असून सदर विहिरीपासून त्यांचे मौजे लोणंद येथील मिळकती दरम्यान चार ते पाच इंची पीव्हीसी पाईप लाईन वन विभागातून कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीरपणे तेथे वृक्षतोड करून जेसीबी, पोकलेन मशीनचे सहाय्याने रात्रीचे वेळेस चोरून तसेच काही ठिकाणी ट्रॅक्टर ब्लास्टिंग उडवून वन विभागाचे तेथील झाडाझुडपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. तसेच तेथील पर्यावरणाची हानी झालेली आहे.

पाईपलाईन वेगवेगळ्या ठिकाणाहून एका चारीमध्ये दोन पाईप, एक चारीमध्ये तीन पाईप अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून 15 ते 16 चाऱ्या काढून अशा बेकायदेशीर कृत्यामुळे सदर ठिकाणी ब्लास्टिंगमुळे गवत झुडपे पेटून आत्ता नवीन लागवड केलेली झाडांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
वस्तुस्थिती कॅनल भरावा नातेपुते फॉरेस्ट गट क्रमांक 242 सदरील गट वनविभाग असून त्यामध्ये वन विभागाच्या हद्दीत असून त्याच्यामध्ये पाच विहिरी आहेत व शेती अंदाजे पाच एकर आहे‌. तीही लोक वहिवाटीत आहेत. त्यामधील विहिरीतून पाईपलाईनच्या सहाय्याने पाणी उपसा करून वन विभागातून नेली आहे व शेती करत आहेत व वहीवाट करीत असताना फॉरेस्ट खात्याचे झाडाझुडपांचे व वन्य प्राण्यांचे वारंवार नुकसान करीत आहेत.

यातील बेकायदेशीर कृत्य करणारे सर्व दोन महिन्यापासून सदर ठिकाणी बेकायदेशीररित्या पाईपलाईन टाकीत होते. त्यावेळेस मौजे लोणंद गावातील अनेक सुजाण नागरिकांनी वनविभाग माळशिरस यांच्याकडे तोंडी तक्रार केलेली होती. तथापि, वन विभाग माळशिरस यांनी सदर बाबत कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही किंवा त्या ठिकाणी वन विभागाने येऊन पंचनामा करण्याची सुद्धा अद्यापपर्यंत तसदी घेतलेली नाही. त्यामुळे अशा अनेक गावातील लोकांनी तक्रारी वेगवेगळ्या तारखेला गावातील लोकांनी उपवनसंरक्षक सोलापूर वनविभाग यांचे कार्यालयाकडे तसेच माळशिरस येथील वन विभागात लेखी तक्रारी अर्ज केले होते. पण, असा अर्ज करणाऱ्या लोकांच्या विरोधात तुमचे फॉरेस्ट अधिकारी पाईपलाईन धारक शेतकऱ्यांना भडकावून अर्जदारांसोबत भांडणे करावया लावतात. हा अर्ज माघारी घ्या नाहीतर तुम्हाला जीवे मारीन, अशा शेतकऱ्यांमार्फत धमक्या दिल्या जातात.

उपवन संरक्षक सोलापूर वन विभाग यांनी दि. 03/07/2023 रोजी क्रमांक ब कक्ष स7 वन गुन्हे 702/2023-24 सोलापूर अन्वये परिक्षेत्र अधिकारी माळशिरस यांना सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून आठ दिवसात संबंधितास कळविणे बाबत आदेश दिलेला आहे. तथापि, वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस यांनी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही.

आमच्या गावातील लोकांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून वर नमूद वनक्षेत्रात पाईपलाईनसाठी परवानगी घेतली आहे काय, यासंदर्भात जन शासकीय माहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस यांना अर्ज केला होता. सदरच्या माहिती अधिकाराचे अर्जाचे उत्तर त्यांनी दि. 03/07/2023 रोजी दिले असून वनक्षेत्रातून पाईपलाईन करणेस वर नमूद व्यक्तींनी परवानगी घेतलेली नाही असे उत्तर पाठविलेले आहे.

यातील वर नमूद व्यक्तींची व अन्य लोकांची अशी एकूण सुमारे 40 पाईपलाईन वन क्षेत्रातून बेकायदेशीररित्या उत्खनन करून वृक्षतोड करून व निसर्गाची हानी करून केलेले आहेत. याबाबत गावातील लोकांनी सोलापूर तसेच माळशिरस येथील वन अधिकारी विभागास वारंवार पत्र व्यवहार करून त्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली परंतु, त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. वरील लोकांनी पोकलेन मशीन, जेसीबी, मशीन, ट्रॅक्टर ब्लास्टिंग हे सर्व जप्त करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी व वरील सर्व लोकांना वन विभागात परवानगी न घेता वृक्षतोड करून ब्लास्टिंग उडवून तयार केलेली पाईपलाईन काढून ती जप्त करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांनी जे काय वन विभागाचे नुकसान केलेले आहे त्याबाबत त्यांच्याकडून नुकसान भरपाई कामे खटला दाखल करण्यात यावा व विषयांकित श्री. दयानंद महादेव कोकरे, श्री‌ धनंजय सुभाष देवकर यांनी या सर्वांशी हात मिळवणी करून आर्थिक लाभापती केलेले हे गैरकृत्यास जबाबदार धरून त्यास कामावरून बडतर्फ करून सदर प्रकरणाबाबत कसून चौकशी होऊन त्यांच्यावर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा अर्जदार तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. असा तक्रारी अर्ज देऊन सोबत माहितीचा अधिकार, माहितीचे पत्राची झेरॉक्स नातेपुते व लोणंद गटातील वन विभागातील 7/12 व 8 A जोडलेले आहेत‌ भूमी अभिलेख नकाशा नातेपुते सोबत जोडलेला आहे.

सदरचा तक्रारी अर्ज दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना भडकावून तक्रारदाराच्या अंगावर सोडलेले होते. सदरचे प्रकरण नातेपुते पोलीस स्टेशन येथे गेलेले होते. त्यामुळे या प्रकरणाचा संदर्भ घेऊन माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर वन विभागाच्या हद्दीत जमिनीवर पिके, पाईपलाईन, शेततळे, विहिरी अशी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort