चिलटं, डास यांचा प्रादुर्भाव वाढल्याने जयसिंह मोहिते पाटील निवडणूक मैदानाच्या प्रचारात मोडका रणगाडा आणि गंजलेली तोफ घेऊन उतरले – गौतमआबा माने पाटील…
….अहो बाळू दादा, आमच्यावर भरोसा नाही का ?, अशी वेळ संताजी धनाजी यांच्यावर म्हणण्याची आलेली आहे.
गोरडवाडी ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी भाषणामध्ये विरोधकांची खिल्ली उडवली होती. चिलटं आणि डास मारायला रणगाडा किंवा तोफांची आवश्यकता लागत नाही. मोहिते पाटील परिवारातील सदस्यांची काय गरज आमचे कार्यकर्ते धनाजी संताजी तुम्हाला पुरून उरतील असे भाषणात सांगितले होते. त्यावेळेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह उमेदवार मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळदादांच्या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिलेली होती.
माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पॅनल प्रमुख फत्तेसिंह माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी पद्मजादेवी मोहिते पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, के के. पाटील, मच्छिंद्रआबा ठवरे, सुरेश आबा पालवे, ॲड. सोमनाथ वाघमोडे, नामदेवनाना वाघमारे, विकासदादा धाईंजे यांची मुद्देसूद व अभ्यासपूर्ण भाषणे झालेली होती.
माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या प्रमुख नेते व पदाधिकारी यांची प्रचाराची रणनीती गनिमी काव्याने सुरू असल्याने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चिलटं, डास यांचा प्रादुर्भाव वाढल्याने जयसिंह मोहिते पाटील निवडणूक मैदानाच्या प्रचारात मोडका रणगाडा व गंजलेली तोफ घेऊन निवडणूक मैदानात उतरलेले असल्याचा खोचक सवाल, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील यांनी उपस्थित करून अहो बाळूदादा, आमच्यावर भरोसा नाही का ?, अशी म्हणण्याची वेळ संताजी धनाजी यांच्यावर आलेली आहे का ?, असाही सवाल उपस्थित केला.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघातील उमेदवारांना 1350 मते पडतील तर ग्रामपंचायत मतदार संघात 400 च्या लीडने उमेदवार निवडून येतील, असे मोठ्या अविर्भावात सांगितले होते. संताजी, धनाजी पुरून उरतील, असे सांगितले असताना गोरडवाडी येथे कॉर्नर सभा घेण्याकरिता मोडका रणगाडा व गंजलेली तोफ घेऊन प्रचारासाठी उतरले असल्याचा आरोप करून पुन्हा एकदा जनता दूध खुळी राहिलेली नाही. येणाऱ्या काळात जनता बेताल वक्तव्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असेही गौतमआबा माने पाटील यांनी मत व्यक्त केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Cuando intenta espiar el teléfono de alguien, debe asegurarse de que no encuentren el software una vez que esté instalado. https://www.mycellspy.com/es/tutorials/how-to-hide-spy-apps-and-track-other-phones-remotely/
Wonderful perspective! The points you made are very enlightening. For further information, visit: DISCOVER MORE. Excited to hear your views!