चि. आशिष कदम पाटील आणि चि.सौ.कां. कोमल जगताप यांचा शुभविवाह संपन्न होणार.
कदम पाटील आणि जगताप परीवाराचे ऋणानुबंधाच्या रेशीमगाठीत नातं जोडलं जाणार
मळोली ( बारामती झटका )
स्वर्गीय निवृत्ती मारुती कदम पाटील यांचे नातू व स्वर्गीय चांगदेव निवृत्ती कदम पाटील रा. मळोली, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव आशिष आणि स्वर्गीय अप्पासाहेब पांडुरंग जगताप यांची नात व स्वर्गीय ज्ञानदेव आप्पासाहेब जगताप रा. पणदरे, ता. बारामती यांची द्वितीय कन्या चि.सौ.कां. कोमल यांचा बुधवार दि. 17/08/2022 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटे या शुभ मुहूर्तावर मोरया मंगल कार्यालय, जगताप वस्ती नजीक, निरा-बारामती रोड, माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे येथे शुभविवाह संपन्न होणार आहे.
कदम पाटील आणि जगताप यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जोडले जाणार आहे. घाईगडबडीत किंवा नजर चुकीने आमंत्रण निमंत्रण देण्यास राहिले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे प्रेषक श्री. शंकरराव तुकाराम कदम पाटील मंडल अभियंता बीएसएनएल पुणे व चिरंजीव अजिंक्य चांगदेव कदम पाटील आणि समस्त कदम पाटील परिवार मळोली, शेंडेचिच तांदळवाडी, वेळापूर यांच्यावतीने मित्रपरिवार व नातेवाईक यांना सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याची नम्र विनंती आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I like this website it’s a master piece! Glad I noticed this ohttps://69v.topn google.Blog monetyze