ताज्या बातम्यासामाजिक
चि. महेश पुरीगोसावी आणि चि. सौ. कां. रिद्धी पुरीगोसावी यांचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न, संभाजी पुरीगोसावी

सातारा (बारामती झटका)
सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यातील करंजखोप गावचे सुपुत्र आणि सातारा नगरीतील करंजे पेठ या ठिकाणी वास्तव्यास असणारे स्वर्गीय रामचंद्र बापू पुरीगोसावी उर्फ (तात्या) यांचे लहान चिरंजीव आणि पोलीस टाईम्स चे पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांचे लहान बंधू महेश पुरीगोसावी आणि रिद्धी पुरीगोसावी यांचा पारंपारिक पद्धतीने सातारा क्षेत्र माऊली या ठिकाणी विवाह संपन्न झाला.
अतिशय थाटामाटात व उत्साह पूर्ण वातावरणात शुभ विवाह सोहळा संपन्न झाला. या शुभविवाह सोहळ्यावेळी नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यासाठी पुरीगोसावी कुटुंबासह पै-पाहुणे व मित्र परिवारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.