Uncategorized

चि. विजय कर्णवर पाटील आणि चि.सौ.कां. स्वाती खांडेकर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावचे कर्णवर पाटील व पंढरपूर तालुक्यातील तापकीर शेटफळ गावचे खांडेकर परिवारांचे ऋणानुबंध बांधले रेशीमगाठीमध्ये.

गोरडवाडी ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावचे माजी पोलीस पाटील श्री. मल्हारी बाबा कर्णवर पाटील यांचे नातू व गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. भागवत मल्हारी कर्णवर पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव विजय कर्णवर पाटील आणि पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील श्री. हरी तुकाराम खांडेकर यांची नात व श्री. सोमनाथ हरी खांडेकर यांची सुकन्या यांचा शुभविवाह गुरुवार दि. 20/10/2022 रोजी दुपारी 1 वाजून 31 मि. या शुभमुहूर्तावर होणार आहे.कर्णवर पाटील आणि खांडेकर परिवारांचे ऋणानुबंध रेशीम बंधाच्या गाठीमध्ये निर्माण होणार आहे.

तरी सदर शाही शुभविवाह सोहळ्यास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे गोरडवाडी व जळभावी गावचे माजी पोलीस पाटील श्री. मल्हारी बाबासो कर्णवर पाटील आणि गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. भागवत मल्हारी कर्णवर पाटील, गोरडवाडी गावच्या माजी सरपंच सौ. मंगल भागवत कर्णवर पाटील, प्रगतशील बागायतदार श्री. शशिकांत मल्हारी कर्णवर पाटील, सौ. रंजना शशिकांत कर्णवर पाटील, अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता श्री. गोविंद मल्हारी कर्णवर पाटील व सौ. वैशाली गोविंद कर्णवर पाटील आणि समस्त कर्णवर पाटील परिवार यांच्या वतीने वेळेवर उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लग्न घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. न मिळाल्यास हेच निमंत्रण व आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे लग्न समारंभाचे संयोजक श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब नानासो कर्णवर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे शहर श्री. सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील, माजी उपसरपंच श्री. साहेबराव सोपान कर्णवर पाटील, गोरडवाडी विकास सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक श्री. मच्छिंद्र माणिकराव कर्णवर पाटील, प्रगतशील बागायतदार श्री‌ रावसाहेब हरिभाऊ कर्णवर पाटील, अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता श्री. गोविंद मल्हारी कर्णवर पाटील यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button