चि. विशाल लवटे पाटील आणि चि. सौ. कां. गौरी वाघमोडे पाटील यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार….
प्रेषक, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. गौतमआबा माने पाटील, मेडदचे माजी सरपंच श्री. नाथाआबा भानुदास लवटे पाटील, लग्नकार्याचे मालक माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. बाळासाहेब साहेबराव लवटे पाटील यांनी मित्रपरिवार व नातेवाईक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे…
माळशिरस (बारामती झटका)
श्री. बाळासाहेब साहेबराव लवटे पाटील रा. मेडद, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव विशाल लवटे पाटील आणि श्री. संजय साहेबराव वाघमोडे पाटील रा. फोंडशिरस, ता. माळशिरस यांची द्वितीय सुकन्या चि. सौ. कां. गौरी वाघमोडे पाटील यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. 22/05/2023 रोजी दुपारी 02 वाजून 15 मिनिटे या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय अकलूज रोड 61 फाटा माळशिरस येथे संपन्न होणार आहे. सदर शुभविवाह सोहळ्याचे प्रेषक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. गौतमआबा नामदेव माने पाटील, मेडद गावचे माजी सरपंच श्री. नाथाआबा भानुदास लवटे पाटील व शुभविवाह कार्याचे मालक माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. बाळासाहेब साहेबराव लवटे पाटील यांनी मित्रपरिवार व नातेवाईक यांना उपस्थित राहून वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्याचे नम्र आवाहन केले आहे.
लवटे पाटील व वाघमोडे पाटील यांच्या शाही शुभविवाह सोहळ्याचे स्वागतोत्सुक श्री. धर्मराज भैरू लवटे सर, श्री. पोपटतात्या भानुदास लवटे पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. शिवाजीराव तुपे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. दादासो जगताप, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. शंकरराव काळे, माजी सरपंच श्री. सचिन उर्फ धुळा लवटे, माजी सरपंच श्री. युवराज झंजे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. दत्ताभाऊ झंजे, श्री. सुनील झंजे, ॲड. विजयकुमार सोनटक्के, शिवामृत दूध संघाचे संचालक श्री. भास्कर लक्ष्मण तुपे, डॉ. जितेंद्र तुपे, श्री. अतुल सरतापे, श्री. जयवंत तुपे, श्री. अधिक मनोहर तुपे, कृषी अधिकारी श्री. बाबा तोरणे, श्री. भारत हांगे, श्री. विजयराव तुपे, ग्रामपंचायत सदस्य महादेव काळे हे आहेत.

शुभविवाह मंगल सोहळा, आयुष्यातील दिव्य स्वप्न, पण हुरहुर असेल ती आपल्या येण्याची, नुसते हो म्हणून शब्दाचे ओझे देऊ नका, आपण आलात म्हणजे स्मित हास्य होईल, या शुभ मंगल प्रसंगी पारिजातकाच्या वर्षावाप्रमाणे, अक्षदांची उधळण आणि स्नेहमय आशीर्वादाची बरसात व्हावी, यासाठी लवटे पाटील व वाघमोडे पाटील परिवारातर्फे आग्रहाचे निमंत्रण दिलेले आहे. तरी आपण वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्तेपरहस्ते निमंत्रण पत्रिका देण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी नजरचुकीने आपणांस पत्रिका अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून लग्नकार्यास उपस्थित राहावे, असे सर्व प्रेषक व लग्नकार्याचे मालक श्री. भानुदास साहेबराव लवटे पाटील व श्री. बाळासाहेब साहेबराव लवटे पाटील यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng