चि. सौ. कां. शाहिनबेगम मुलाणी, कोळेगाव व चि. यासीनसाहब मुलाणी, अकलूज यांचा शुभविवाह होणार संपन्न
ज. पिरसाहेब मुलाणी आणि म. सलिम मुलाणी यांचे रेशीमबंध विवाह बंधनात जुळणार
कोळेगाव (बारामती झटका)
म. बासुलाल फत्तु मुलाणी यांची नात व ज. पिरसाहेब बासुलाल मुलाणी, रा. कोळेगाव, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. शाहिनबेगम आणि म. मुर्तुजा इब्राहिम मुलाणी यांचे नातू व म. सलीम मुर्तुजा मुलाणी, रा. अकलूज, ता. माळशिरस यांचे चिरंजीव यासीनसाहेब यांचा शुभविवाह सोमवार दि. २२/०५/२०२३ रोजी दु. १.१५ वा. राजयोग मंगल कार्यालय, साळमुख, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
तरी या मंगल सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून वधूवरांस आशीर्वाद देण्याचे आवाहन ज. शाहरुख पिरसाहेब मुलाणी उपाध्यक्ष, माळशिरस तालुका पत्रकार संघ आणि ज. माजीद मेहबूब मुलाणी, वेळापूर, यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन मुलाणी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng