ताज्या बातम्या
छत्रपती संभाजीराजे महाराज यांचा सोलापूर जिल्ह्यात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शाही सन्मान संपन्न
सांगोला (बारामती झटका)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांचा शाल, फेटा, हार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी अखंड भागवत सांप्रदायाचे प्रतीक पांडुरंगाची मूर्ती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक व फाउंडेशन वाडीचे माजी उपसरपंच धनाजी साखळकर, मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या वतीने देण्यात आली.
खासदार छत्रपती संभाजीराजे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शाही सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी छत्रपती संभाजी राजे भोसले महाराज व शिवश्री धनाजी साखळकर यांच्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी प्रदीर्घ चर्चा झाली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng