महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची फोंडशिरस येथे जाहीर सभा…

स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची स्थानिक स्वराज्य संस्था, सोलापूर जिल्हा परिषद व माळशिरस पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने फोंडशिरस, ता. माळशिरस येथे रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 01 वाजता जाहीर सभा होणार आहे..
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे 09 सदस्य व पंचायत समितीचे 18 सदस्य निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत. दहिगाव जिल्हा परिषद गट संस्कृती राम सातपुते, मांडवे जिल्हा परिषद गट, श्री. धर्मराज वसंत माने, संग्रामनगर जिल्हा परिषद गट सौ. मेघा रामचंद्र कचरे, फोंडशिरस जिल्हा परिषद गट श्री. हरिदास काशिनाथ पाटील, माळीनगर जिल्हा परिषद गट श्री. नागेश संपत तुपसौंदर, वेळापूर जिल्हा परिषद गट सौ. प्रेरणा जयंत खंडागळे, निमगाव जिल्हा परिषद गट ज्योती विनायक ठवरे, पिलीव जिल्हा परिषद गट श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव, बोरगाव जिल्हा परिषद गट श्री. संजय नामदेव साठे, असे नऊ सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.

दहिगाव पंचायत समिती गण सौ. तनुजा बाळू खिलारे, गुरसाळे पंचायत समिती गण श्री. दत्तात्रय विठोबा शेळके, मांडवे पंचायत समिती गण सौ. राजश्री राहुल रुपनवर, कण्हेर पंचायत समिती गण श्री. आनंदराव नामदेव शेंडगे, संग्रामनगर पंचायत समिती गण सौ. राजेश्वरी कृष्णराज माने पाटील, मेडद पंचायत समिती गण श्री. नाथा आबा लवटे, फोंडशिरस पंचायत समिती गण चंद्रकांत वाघमोडे, भांबुर्डी पंचायत समिती गण श्री. देविदास नारायण वाघमोडे, माळीनगर पंचायत समिती गण श्री. विजय हरिदास खंडागळे, लवंग पंचायत समिती गण सौ. ऋतुजा विक्रम पराडे पाटील, वेळापूर पंचायत समिती गण श्री. अमृतराज सूर्यकांत माने देशमुख, यशवंतनगर पंचायत समिती गण श्री. अशोक मधुकर एकतपुरे, निमगाव पंचायत समिती गण श्री. किरण वसंतराव पाटील, गोरडवाडी पंचायत समिती गण सौ. चांगुणाबाई साहेबराव गोरड, पिलीव पंचायत समिती गण सौ. नम्रता शिवराज पुकळे, तांदुळवाडी पंचायत समिती गण सौ. वैशाली किसन फुलारे, बोरगाव पंचायत समिती गण सौ. हेमलता अनिल जावीर, जांभूड पंचायत समिती गण श्री. राहुल लक्ष्मण खटके असे 18 पंचायत समिती सदस्य निवडणूक रिंगणात उभे आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजितदादा पवार, यांच्यासह अनेक पक्ष व संघटना एकत्र येऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक चित्र निर्माण झालेले आहे. पहिल्यांदाच माळशिरस तालुक्यात अशा विचित्र आघाड्या निर्माण होऊन निवडणूक लागलेली आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



