Uncategorized

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज यांच्या शुभहस्ते लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचा सन्मान संपन्न…

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे माजी अध्यक्ष गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या शुभहस्ते सन्मान संपन्न.

मळोली (बारामती झटका)

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे माजी अध्यक्ष गुरुवर्य ह.भ‌.प. बापूसाहेब देहुकर महाराज यांच्या शुभहस्ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा सन्मान मळोली ता. माळशिरस येथील स्वर्गीय वेणूबाई कदम पाटील यांच्या पंधराव्या पुण्यस्मरणानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी केला. त्यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शिक्षण, कला, क्रीडा, कृषी व सांप्रदायिक मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मळोली येथील चिरंजीव प्रज्योत संतोष घोरपडे हा मुलगा पुणे येथे मृदंग वाजवायला शिकत आहे. माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार राम सातपुते देहू येथील कार्यक्रमात उपस्थित असताना प्रज्योत यांनी त्यांच्याशी संपर्क साधून माळशिरस तालुक्यातील गावाचे नाव सांगितले. मतदारसंघातील प्रज्योत असल्याने विचारपूस करून मृदुंग वाजवण्याचे शिकत असल्याने परिस्थिती कशी आहे‍, याची विचारपूस न करता लोकप्रिय आमदार यांनी मृदंग सप्रेम भेट देण्याचा मानस केलेला होता. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. गुरुवर्य बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या शुभहस्ते मृदंग देण्यात आला.

लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचा सन्मान गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या शुभहस्ते समस्त भागवत संप्रदाय व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button