Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

जयसिंह मोहिते पाटील यांना मतदारांचं काय ? वांग कळत का ?- गौतमआबा माने पाटील.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या घोडं मैदान लांब नाही, ग्रामपंचायत मतदार संघातून 400 मताधिक्याचे लीड घेऊन दाखवावे.. गर्वाने बोलू नका मतदार गर्वाचे घर खाली करणार…

नातेपुते ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवरत्न बंगला येथे संपन्न झाला यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते धैर्यशील मोहिते पाटील सर्व उमेदवार मतदार व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना जयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामपंचायत मतदार संघातून 400 च्या लीडने विजयी होतील व संस्था मतदार संघात 1350 मते पडतील असा अंदाज व्यक्त केला यावरून माळशिरस पंचायत समितीचे सदस्य पश्चिम भागातील नेते गौतमआबा माने पाटील यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्या अंदाजावर मतदारांच काय ? वांग कळत का ? असा खोचक टोला लगावलेला आहे. पूर्वीचा काळ होता जनता अडाणी होती तुम्ही सांगत होता तसं ऐकत होती आताचा काळ तसा राहिला नाय जनता सुज्ञ झालेली आहे दूध खुळी राहिलेली नाही. गर्वा मध्ये बोलू नका जनता तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही गर्वाचे घर मतदार खाली केल्याशिवाय राहणार नाहीत असे परखड मत व्यक्त केले.


गौतमआबा माने पाटील पुढे बोलताना म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही सर्व विरोधी गटातील भाजप समवेत असल्याने भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखापेक्षा जास्त लीड मिळालेले आहे. विधानसभेच्या वेळी जयसिंह मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांचा 71 हजार मताधिक्यानी विजय होणार असे उपस्थित त्यांना सांगून हातामध्ये नारळ घेऊन हात उंचावून सांगितलेले होते मात्र 2590 मताने आमदार यांचा विजय झालेला होता. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी अकरा सदस्य जिल्हा परिषद व 22 पंचायत समिती सदस्य असे सांगून नारळ फोडलेला होता 03 जिल्हा परिषद सदस्य व 06 पंचायत समिती सदस्य विरोधी गटाचे निवडून आलेले होते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत विभागात विरोधी गटांची मताची विभागणी झालेली असताना सुद्धा एक अंकी फरकाने उमेदवारांचे पराभव झालेले होते. यंदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघातून पद्मजादेवी मोहिते पाटील उत्तमराव जानकर के के पाटील यशवंत उर्फ दादाराजे घाडगे यांची उमेदवारी आहे. भाषणामध्ये उत्तमराव जानकर यांनी ओपन गटातून उमेदवारी अर्ज भरायला पाहिजे होता असे म्हणता उत्तमराव जानकर यांचा ग्रामपंचायत मतदार संघात कोणत्या का गटातून असं ना उमेदवारी अर्ज आहे समोर पराभव दिसत असल्याने आपल्या घरातील उमेदवारी दिलेली नाही कार्यकर्त्यांना बळीचे बकरे बनवलेले आहेत धनाजी संताजी यांची उपमा देऊन विरोधकांना चिलट व डासाचे उपमा देता याचे उत्तर मतदार तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत देतीलच असा सणसणीत टोला पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील यांनी लगावलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा.https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button