Uncategorized

जयसिंह मोहिते पाटील यांना तांदुळवाडी व कोळेगावकरांचा सवाल, अकलाई मंदिर पवित्र आहे आमची मंदिरे अपवित्र आहेत का ?

मदनसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत तांदुळवाडी येथे हनुमान मंदिर व कोळेगाव येथे माऊली मंदिर प्रचाराच्या सभा झाल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट…

जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड. नागेश काकडे, तांदुळवाडीचे उपसरपंच शशिकांत कदम पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन उदयसिंह राजगुडे, कोळेगावचे ॲड. धनंजय सावंत यांचा जयसिंह मोहिते पाटील यांना थेट सवाल…

तांदुळवाडी ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवीस श्रीफळ वाढवून मंदिर परिसरात प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या सभेविषयी विचारविनिमयाची बैठक आयोजित केलेली होती. सदरच्या ठिकाणी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी सदरच्या ठिकाणी विचार विनिमयाची सभा घेण्यास मनाई केलेली होती. सदरच्या ठिकाणी खुर्च्या व इतर साहित्य गुंडाळायला लावलेले होते. उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मंदिराच्या परिसरात धार्मिक कार्यक्रम केले जातात. पवित्र स्थान आहे, राजकीय कार्यक्रम करू नये, असा सल्ला दिलेला होता. त्याप्रमाणे माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या नेते व कार्यकर्ते यांनी मंदिर परिसरामध्ये सभा न घेता बाजूच्या सांस्कृतिक भवनमध्ये विचार विनिमयाची बैठक झालेली होती. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये या गोष्टीचा तीव्र संताप होता.

सत्ताधारी मोहिते पाटील गटाचे उमेदवार मदनसिंह मोहिते पाटील व अनेक उमेदवार नेते व कार्यकर्ते यांनी तांदुळवाडी येथे हनुमान मंदिर व कोळेगाव येथे माऊली मंदिर या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत. यावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. नागेश काकडे तांदुळवाडीचे उपसरपंच शशिकांत कदम पाटील, तांदुळवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन उदयसिंह राजगुडे व कोळेगावचे विधी तज्ञ ॲड. धनंजय सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तुमचे मंदिर पवित्र आणि आमची मंदिरे अपवित्र आहेत का ?, असा थेट सवाल अकलाई देवी मंदिरात विचार विनिमयाची सभाला आटगाव करणाऱ्या जयसिंह मोहिते पाटील यांना विचारलेला आहे. जयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलाई मंदिरातील वर्तनाची माळशिरस तालुक्याच्या गावागावात व वाड्यावर तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button