जननायक मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. बाळकृष्ण दाते प्रशाला समितीचे सभापती युवा नेते बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते नगरीचे थोर सुपुत्र अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व नातेपुते एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाळकृष्ण दाते प्रशालेचे सभापती युवा नेते जननायक बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मामाश्री प्रतिष्ठान व साई सेवा दल नातेपुते यांच्यावतीने मंगळवार दि. 23/08/2022 रोजी सकाळी 09 ते सायंकाळी 05 या वेळेमध्ये अतुल उद्योग समूह नातेपुते या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.


समाजामध्ये अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत असते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. रक्तदान ही चळवळ व्हावी यासाठी जननायक मामासाहेब पांढरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मामाश्री प्रतिष्ठान व साई सेवा दल नातेपुते यांच्यावतीने भव्य रक्तदान सोहळ्याचा समाज उपयोगी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
