Uncategorizedताज्या बातम्या

जलनायक शिवराज पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर व शासकीय योजना शिबिराचे आयोजन

पिलीव (बारामती झटका)

जलनायक शिवराज (भाऊसाहेब) पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज पुकाळे युवाशक्तीच्या माध्यमातून महारत्न सांस्कृतिक, क्रीडा व बहुउद्देशीय संस्था झिंजेवस्ती व त्रिवेणी ज्ञानपीठ पुणे यांच्या द्वारा मोफत आरोग्य शिबिर व शासकीय योजना शिबिराचे आयोजन मंगळवार दि‌. २४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पडळकर कॉम्प्लेक्स, एसटी स्टँड, पिलीव येथे करण्यात आले आहे. लोकांना विविध योजनांची माहिती करून देणे व जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून देणे व गावातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये नवीन रेशन कार्ड नोंदणी व वाटप, रेशन संबंधी समस्यांचे निराकरण, दुय्यम शिधापत्रिका नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, नावे ऑनलाईन करणे, नाव दुरुस्ती करणे तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा महिलांसाठी, घटस्फोटीत महिलांसाठी, दिव्यांगांसाठी योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्त वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आदी योजनांविषयी माहिती देण्यात येऊन गरजूंना या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर मोफत आरोग्य शिबिरामध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत नेत्र तपासणी, व मोतीबिंदू निदान तसेच गरजवंतांना अल्प दरात चष्म्यांचे वाटप, संपूर्ण शरीर मोफत तपासणी, अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत इसीजी, हृदयविकार, मेंदू विकार, मोतीबिंदू, बायपास शस्त्रक्रिया, मधुमेह, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, फिट, पॅरालिसिस, डोकेदुखी, चक्कर, स्नायूंचे आजार, किडनी विकार, हर्निया, मुळव्याध, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स, पोटाच्या व इतर शस्त्रक्रिया याविषयी योग्य मार्गदर्शन करून यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

तरी जास्तीत जास्त संख्येने लाभार्थ्यांनी उपस्थित राहून या शासकीय योजनांचा आणि मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button
16:09