रोटरी क्लब अकलूज व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित

श्रीपूर (बारामती झटका)
रोटरी क्लब अकलूज व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखान्याच्या परिसरात ऊस तोडणी महिला कामगार यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख संदीप लोणकर, डॉ. अभिजीत मगर, अजित वीर, मनीष गायकवाड, अभिषेक टेके, ओजस दोबाडा, गजानन जंवजाळ, यबाजी सर, पांडुरंग कारखान्याचे कृषी अधिकारी संतोष कुमठेकर, चीप अकाउंटंट रवींद्र काकडे, कृषी विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पोफळे, डॉ. प्रमोद पवार, भीमराव बाबर तसेच कॅन्सर तपासणीसाठी कराड मेडिकल कॉलेज सातारा येथील आलेले डॉ. आरुषी शर्मा, डॉ. नेहा पडवळ, सागर पवार, डॉ. तनवी डांगे, दिशा पारगे, सुषमा शेटे, शितल पोळ, प्रिया कदम, माधुरी गायकवाड, गुंजन पाटील, आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तपासणी बरोबरच कॅन्सरची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना व वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

कारखान्याच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ कारखान्याचे कर्मचारी, ऊस तोडणी महिला कामगार यांनी घेतला. अनेक जणांनी तपासणी करून आरोग्याबाबत जागरूकता व्यक्त केली. वेळीच तपासणी केल्यास कॅन्सरवर यशस्वी उपचार शक्य असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पांडुरंग कारखाना नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतो. यामध्ये ऊस तोडणी महिला कामगारांना साड्या, लहान मुलांना स्वेटर्स आदीचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारचे आरोग्य व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



