पिलीव येथील वसंत गणपत देवकर यांचे दुःखद निधन

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
पिलीव ता. माळशिरस येथील मूळ रहिवासी परंतु सध्या भांबुर्डी चाहूर वस्ती, ५६ फाटा या ठिकाणी वास्तव्यास असलेले वसंत गणपत देवकर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे दुःखद निधनाची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रमंडळी, सगेसोयरे यांनी त्यांचे राहते घरी अंत्यदर्शनासाठी बहु गर्दी केली व अंत्ययात्रेमध्ये सामील होऊन देवकर परिवाराचे सांत्वन केले.
स्व. वसंत देवकर हे मनमिळावू व मनमोकळ्या स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे नातेवाईक व मित्रमंडळींकडून बोलले जात आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, चार भाऊ, एक बहीण व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने नाभिक समाजामध्ये व मित्रमंडळींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या तिसऱ्याचा कार्यक्रम (सावडण्याचा) चाहूर वस्ती ५६ फाटा भांबुर्डी ता. माळशिरस येथे उद्या दि. १५/०९/२०२२ रोजी सकाळी ७.३० वा. होणार असल्याचे समजते.
स्व. वसंत देवकर यांच्या आत्म्याला शांती लाभो व देवकर परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना….
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng