सरकारी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायीक बनलेल्या सांगली जिल्ह्यातील सौ. सुरेखा माळी यांची जीवनगाथा…

अकलूज (बारामती झटका)
कष्ट, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर सांगली जिल्ह्यातील आष्टा (ता. वाळवा) येथील सौ. सुरेखा बाळासाहेब माळी यांनी सरकारी महिला बचत गटाच्या माध्यमातून छोटासा हाॅटेलचा व्यवसाय करत त्या स्वावलंबी बनल्या आहेत.
आष्टा येथील सौ. सुरेखा माळी यांनी शारदा माता महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन छोटासा हाॅटेलचा व्यवसाय सुरू करून आज महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात होणा-या यात्रा, जत्रा, उरूस, फेस्टिव्हलमध्ये आपल्या हाॅटेलचा स्टाॅल उभारून तेथे चवदार व ताजे थालीपीठ, दही, शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, अप्पे चटणी, पोट्याटो स्पिंग रोल असे अनेक पदार्थ करून खवय्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या स्टाॅलवर खवय्यांची गर्दी होत आहे.

माळीनगर (ता. माळशिरस) येथे माळीनगर फेस्टिव्हलचे दि. २ ते ६ डिसेंबर या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तिथेही आपले छोटेसे हॉटेल सुरू केले आहे. एखाद्या कुटुंबातील कर्तृत्ववान महिलेच्या पाठीशी घरातील लोकांची साथ मिळाली तर त्या घराची प्रगती ही नक्कीच होते, सौ. सुरेखा माळी यांच्या कर्तृत्वाने हे सिध्द झाले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास, अहोरात्र कष्ट करत त्यांनी स्वतःचे व बचत गटाचे नांव संपूर्ण महाराष्ट्रात केले आहे. विशेष म्हणजे हाॅटेलचा व्यवसाय करत असताना त्यांना एकदा हदय विकाराचा झटका येऊन गेला आहे तरीही त्यांचे हे कार्य करण्याचे निरंतर चालू आहे. त्यांनी आपल्या मुलांना विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यामुळे दोन्ही मुले ही स्वावलंबी झाली आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.