Uncategorizedताज्या बातम्या

जिजाऊ माँसाहेबांच्या जयंत्ती निमित्ताने “जुनी पेंशन योजना लागू करा” साठी घातले साकडे

कदमवाडी (बारामती झटका)

आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कदमवाडी नं. २ येथे अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सुरवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी “जिजाऊ वंदना” गाऊन माँसाहेबांना विनम्र अभिवादन केले. या जयंती निमित्ताने शालेय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, इंग्रजी शब्द लेखन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, मी होणार अधिकारी यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षणप्रेमी हनुमंत धोंडीबा बाबर यांनी केले.

जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेचे पुजन हनुमंत धोंडीबा बाबर व कमल हनुमंत बाबर यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव मिसाळ यांनी आज खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राला राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची गरज आहे. जिजाऊंच्या कार्याबद्दल त्यांनी प्रास्ताविक केले. शालेय विद्यार्थीनी रिद्धी सुनिल गायकवाड हिने जिजाऊ माँसाहेबांची वेशभूषा केली होती. जणूकाही ‘आज आपल्या शाळेत स्वत: जिजाऊ माँसाहेब आलेल्या आहेत’, अशी बोलकी प्रतिक्रिया शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

दिपक परचंडे यांनी आज प्रतिकात्मक जिजाऊ माँसाहेबांना “जुनी पेंशन योजना लागू करा” असा आदेश आपल्या स्वराज्यातील ‘शिंदे-फडणवीस’ सरकारला आदेश करा, अशा आशयाचे निवेदन दिले. या अनोख्या निवेदनाची चर्चा ही पेंशन फायटर बांधवांमध्ये होती.

जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी हिवाळी अधिवेशन दरम्यान काढलेल्या मोर्चा वेळी शिंदे-फडणवीस सरकारने मयत कर्मचारी बांधवांना फॅमिली पेंशन व ग्रॅज्युअटी देण्याचे आश्वासन दिले व पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतो असे सांगितले. परंतु, आजपर्यंत तसा शासन निर्णय झाला नाही, म्हणून “जुनी पेंशन योजना लागू करा” या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज प्रतिकात्मक जिजाऊ माँसाहेबांना हे निवेदन देऊन भावना व्यक्त केल्या. – दिपक परचंडे, राज्यकार्याध्यक्ष शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button