ताज्या बातम्या

जि. प. सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते निरगुडी रस्त्याचे भूमिपूजन

फलटण (बारामती झटका)

आज मांडवखडक विंचुर्णीमार्गे निरगुडी रस्त्याचे भूमिपूजन जि. प. सदस्या सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सांगीतले कि, केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे व पुढे पण होणार आहे.

या वेळेस भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुशांतभैया निंबाळकर, स्वराज्य पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीतभैया नाईक निंबाळकर, निरगुडी विकास सोसायटीचे चेअरमन युवराज सस्ते, उद्योजक शरदनाना सस्ते, उद्योजक शंभूराजे बोबडे, सातारा जिल्ह्याच्या आदर्श महिला सरपंच सौ. अस्मिता निंबाळकर, विंचुर्णीच्या सरपंच सौ. राणीताई चव्हाण, उपसरपंच सौ. पुनमताई ईतापे, दिपक निबाळकर (अध्यक्ष तंटामुक्त समिती), जयदीप निंबाळकर, कॉन्ट्रॅक्टर अमोल निंबाळकर, कॉन्ट्रॅक्टर सागरशेठ शहा, पंढरीतात्या ईतापे, मानसिंग इतापे, नवनाथ बागल, हणमंत बागल, बुवासाहेब बागल, आदिनाथ ननावरे, आशिष ननावरे, संजय निकाळजे, संजय भोईटे, सुरेश गायकवाड, राजेंद्र चोरमले, मामा निकाळजे व इतर मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. Hello there! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good
    success. If you know of any please share. Thank you! You can read similar article here: Eco product

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button