जेऊरमध्ये मुख्यमंत्री व खासदारांचे स्वागताचे डिजिटल बोर्ड फाडले…
तीन जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल
करमाळा (बारामती झटका)
जेऊर एसटी स्टँड ला दोन कोटी निधी मिळाला, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिनंदन व अमृतभारत योजनेतून वीस कोटी रुपये जीवन रेल्वे स्टेशनला मिळवून दिले याबद्दल खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचे अभिनंदन डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते.
जेऊर ग्रामपंचायतीचे कर्मचारी समीर हमीद शेख यांच्या सांगण्यावरून बापू जाधव व सागर कांबळे यांनी सदरचे डिजिटल बोर्ड फाडले, अशा आशयाची तक्रार बाळासाहेब करचे यांनी दिली आहे.
जेऊर एसटी स्टँडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी अमृत योजनेतून जेऊर रेल्वे स्थानक सुशोभीकरण करण्यासाठी वीस कोटी कोणार्क एक्सप्रेस थांबा मंजूर केल्याबद्दल रविवारी जेऊर येथे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचा कार्यक्रम होता.
कार्यक्रमासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व पक्षाच्या गटातटाच्या कार्यकर्त्यांनी स्वागताचे डिजिटल बोर्ड लावले होते. मात्र, एसटी स्टँड समोर लावलेला बोर्ड काढण्यासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी समीर शेख यांनी दोन जणांना हाताशी धरून हे बोर्ड फाडले आहेत, अशी तक्रार दिली आहे.
याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी देशात लोकशाही असून अशा पद्धतीने डिजिटल फाडणे योग्य नाही. या घटनेचा करमाळा शिवसेनेने निषेध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख महेश चिवटे आदींचे फोटो असलेले जेऊर ग्रामस्थांनी डिजिटल लावले होते. या घटनेत करमाळा पोलिसात तक्रार झाली दाखल झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे करत आहेत.
प्राध्यापक रामदास झोळ – विकासाची स्पर्धा करून जेऊरचा विकास झाला पाहिजे, अशा घटनांमुळे जेऊरची प्रगती खुंटली आहे.
नितीन खटके अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड – जेऊर एसटी स्टँडसाठी गेली २५ वर्षापासून एक रुपयाचा, निधी मिळाला नव्हता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने व जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. याचे स्वागत करण्यासाठी जेऊर ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने डिजिटल लावले होते. घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. मात्र काही समाज कंटकांनी हे बोर्ड फाडले आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसात भादवि ४२७/३४ बापू विलास जाधव, सागर सोपान कांबळे, समीर अहमद शेख या तिघांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng