जेष्ठ नेते शामराव भोसले आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार
श्रीपूर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते शामराव भोसले हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन लवकरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीत त्यांचे नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती शामराव भोसले यांनी दिली आहे.
शामराव भोसले हे दलित पॅन्थरपासून चळवळीत सक्रिय आहेत. रिपब्लिकन पक्षाचे ते जवळपास चाळीस वर्षे कार्यकर्ते म्हणून माळशिरस तालुक्यात कार्यरत आहेत. राजाभाऊ सरवदे यांचे सडेतोड विचार, कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची भूमिका व आत्तापर्यंत त्यांनी चळवळ व्यापक व मजबूत करुन दिलेले योगदान पहाता त्यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली काम करुन पक्ष वाढीसाठी माळशिरस तालुक्यातील व विशेष म्हणजे पूर्वभागातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याची माहिती शामराव भोसले यांनी दिली आहे. माळशिरस तालुक्यातील गटबाजी संपवून सरवदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, चैतन्य व आनंद पसरल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.
शामराव भोसले यांना माळशिरस तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचा कायम वावर असतो. चळवळीतील प्रत्येक कार्यात ते सहभागी असतात. ते ज्या गटात काम करायचे त्यांनी आत्तापर्यंत स्वतः पुरते पाहिले. केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांचे आदेशानुसार गट तट विसरून व्यापक भूमिका पक्ष मजबुतीसाठी राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने काम करणार असल्याची ग्वाही भोसले यांनी दिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
https://unlimit-casino-se.com/