Uncategorized

जे.एम. म्हात्रे कंपनीचे काम तात्काळ थांबवण्याची उचीत कार्यवाही करावी – आरोग्यमंत्री ना.तानाजीराव सावंत.

आरोग्य मंत्री ना. तानाजीराव सावंत यांनी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या पत्राची दखल घेतली.

पुणे ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार तानाजीराव सावंत यांनी बाळासाहेबांची शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील यांच्या पत्राची दखल घेऊन जे. एम. म्हात्रे कंपनीचे काम तात्काळ थांबवण्याची उचित कारवाई करावी, असा इशारा पीडब्ल्यूडी विभागाला दिलेला आहे.

नामदार तानाजीराव सावंत यांच्याकडे दिलेल्या पत्रामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी असे नमूद केलेले आहे की, जे. एम‌. म्हात्रे आणि कंपनी यांच्याकडे सोलापूर जिल्हा सरहद्द ते खुडूस असे पालखी महामार्गाचे काम आहे. हे काम अतिशय कासव गतीने चालू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. माळशिरस तालुक्यात पाच व आजूबाजूच्या तालुक्यामध्ये दहा साखर कारखाने आहेत. कारखान्यावरील ऊस वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. तसेच सदाशिवनगर साखर कारखाना चालू झाला, त्या दरम्यान वरील कंपनीने काम जोराने चालू केले आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे मृत्यू सापळा झाला आहे.

मुंबई, पुणे या ठिकाणावरून पंढरपूरकडे येणारे भाविक तसेच माळशिरस कोर्ट, तहसील ऑफिस, पंचायत समिती अकलूज मधील दवाखाने या ठिकाणी जाणे येणे यासाठी मृत्यूच्या दाढेतून जावे लागते. तसेच वरील कंपनीचे अवजड वाहने वाहतूक करत असतात, त्यामुळे आणखी वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. घरून कामानिमित्त गेलेला व्यक्ती रात्री घरी परत येईल का नाही, याची खात्री देता येत नाही. बऱ्याच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेटर व रेडियम दिसत नाही‌, याकडे पोलीस व आरटीओ यांचे लक्ष नाही.

एवढे प्रश्न निर्माण होऊन सुद्धा जे. एम‌. म्हात्रे कंपनीचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे. त्यामुळे साखर कारखाने बंद होईपर्यंत जे. एम. म्हात्रे आणि कंपनीची अवजड वाहतूक बंद करावी व काम थांबवावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी केलेली असून सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button