ज्ञानदेव शिंदे (दादा) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पिरळे येथे विविध सामाजिक उपक्रम

नातेपुते (बारामती झटका)
पिरळे ता. माळशिरस येथील पत्रकार प्रमोद शिंदे यांचे वडील बुद्धवासी ज्ञानदेव निवृत्ती शिंदे यांचा मंगळवार दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी 11:30 प्रथम स्मृतिदिन असून या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे.
सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार भीम शाहीर विजय सरतापे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम तसेच समाज मंदिर परिसरात वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पुस्तक वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्धवासी ज्ञानदेव शिंदे हे दलित पॅंथर सोलापूर शहर शाखेचे खजिनदार होते. नामदेव ढसाळ व रामदासजी आठवले यांचे निकटवर्ती संबंधित होते. गावात व माळशिरस तालुक्यात अनेकांचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना वाचण्याची खूप आवड होती. जवळपास दहा हजारापेक्षा जास्त पुस्तक वाचण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.


सदर स्मृती दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमोद शिंदे आणि परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng



