ताज्या बातम्यासामाजिक

ज्येष्ठ विचारवंत अन् लेखक डॉ. प्रा. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई (बारामती झटका)

लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. तसेच ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यही राहिले आहेत.

डॉ. प्रा. हरी रामचंद्र नरके हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर होते. सोशल मीडियावरही ते सातत्याने लिखाण करत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा मोठा फॅन फॉलोविंग होता. विशेष म्हणजे २० तासांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एका मुलाखतीसंदर्भातील पोस्ट केली आहे. त्यामुळे, त्यांच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याशिवाय महात्मा फुले यांचे मूळ छायाचित्र शोधून प्रसिद्ध करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button