ठवरे पाटील परिवार यांनी मातोश्री श्रीमती पार्वती यांच्या स्मृती जपून पर्यावरणाचा समतोल साधला.
खुडूस ( बारामती झटका )
खुडूस ता. माळशिरस येथील श्रीमती पार्वती विठ्ठल ठवरे पाटील यांच्या परिवाराने अनोख्या पद्धतीने स्मृती जपून पर्यावरणाचा समतोल साधून समाजामध्ये आगळावेगळा समाज परिवर्तनाचा संदेश दिलेला आहे. श्रीमती पार्वती विठ्ठल ठवरे पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवार दि. 02/04/2023 रोजी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर खुडूस येथील निवासस्थानाशेजारील शेतामध्ये माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा, जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त उप अभियंता गणपत, खुडूसचे माजी सरपंच ॲड. शहाजीकाका, श्री विठ्ठल कृषी केंद्राचे उत्तमराव, श्री विठ्ठल नर्सरीचे अनंतराव अशा पाच मुलांनी शोकाकुल वातावरणात मुखाग्नी देऊन अंतिम संस्कार केले होते.
वैकुंठवासी स्वर्गीय श्रीमती पार्वती ठवरे पाटील यांच्या रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 04/04/2023 रोजी सकाळी 07 वाजता संपन्न झाला. यावेळी राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, शिक्षण, क्षेत्रासह विविध राजकीय पक्षाचे, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, नगरसेवक, विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्था, दूध संस्था, मजूर संस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित इंजिनीयर, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, कॉन्ट्रॅक्टर, पत्रकार यांच्यासह खुडूस पंचक्रोशीतील नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते ऋषितुल्य नेतृत्व माजी कृषीमंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख व जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे साहेब यांच्या शुभहस्ते मातोश्रींच्या स्मृती जपण्यासाठी केशर कलमी आंब्याचे रोप लावून त्या ठिकाणी रक्षा विसर्जन करण्यात आली. समाजामध्ये आदर्श घ्यावा अशा अनोख्या पद्धतीने ठवरे पाटील परिवार यांनी मातोश्रीच्या स्मृती जपून समाजाला वेगळा संदेश दिलेला आहे. आपल्या आई-वडिलांची कायम आठवण येणार, आंब्याचे रोप परिपक्व झाल्यानंतर फळे आल्यावर आठवण येणार आहे. विशेष म्हणजे पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असताना पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. त्यामुळे ठवरे पाटील परिवार यांनी मातोश्री श्रीमती पार्वती यांच्या स्मृती जपून पर्यावरणाचा समतोल साधला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng