ठाणे महानगरपालिका तोंडावर, जितेंद्र आव्हाडांना शिंदे फडणविसांचा घेरण्याचा डाव…
ठाणे (बारामती झटका) हर्षल बागल यांजकडून
भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश बॉडीवर असलेल्या रिदा रशिद या महिलेने राज्याचे माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. एका गर्दीत रिदा रशिद यांना आव्हाडांनी हाताने बाजुला जा गर्दीत कशाला आलात असे म्हणत बाजुला केले. पण त्याच वेळी आव्हाडांनी आपला विनयभंग केला असा आरोप भाजपच्या कार्यकर्ती असलेल्या रिदा रशिद यांनी केलाय. सदर विनयभंगाचा गुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर आव्हाडांवर दाखल झाला असल्याने याला राजकीय वास व फुस आहे हे ऊघडपणे समजुन येत आहे. आगामी काळात ठाणे महापालिकेत जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणविस यांना जड जाणार हे ओळखुनच ही अडकवण्याची एक बेकायदेशीर राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.
जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे फायरब्रँण्ड नेते असुन हरहर महादेव चित्रपट व वेडात वीर दौडले सात या दोन्ही चित्रपटात इतिहासाची जी तोडफोड केली त्यावर देखील त्यांनी आक्षेप घेतले आहेत. इतिहासाच्या मुद्यावर ते नेहमीच आग्रेसर राहिलेत. काल परवा देवेंद्र फडणवीस ठाण्यात आले असता ऊरकता दौरा घेतला. ठाण्यातील शिंदे सेना व भाजपाचे विरोधक संपवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना अडकवणे हे षडयंत्र आहे. असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा राशिद कोण आहेत?
रिदा रशिद या भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. त्या भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेशबॉडीवर पदाधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस विनोद तावडे, निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, सुधिर मुनगूंटीवार हे भाजपाचे नेते यांच्याशी रिदा रशिद यांची जवळीकता आहे. कळवा मुंब्रा येथुन रशिद यांनी आव्हाडांच्या विरोधात आमदारकी जिंकायची आहे.
तर ठाणे महापालिका एकनाथ शिंदे व फडणविसांच्या हातातुन जाणार
काल परवा एका खाजगी वृत्तवाहिनेने केलेल्या सर्व्हेनुसार ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेसचे मताधिक्य येऊ शकते. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे शिंदे फडणसविसांसमोर आव्हान आहे. जर आव्हाडांना आत्ताच रोखले नाही तर शिंदे फडणविसांना सत्तेत असुनही घरच्या मैदानात पराभवाची नामुष्की येऊ शकते. परंतु, आव्हाडांवर खोटा गुन्हा दाखल केल्याने ठाण्यातुन आव्हाडांना सहानभुती मिळताना दिसुन येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.info/sk/join?ref=RQUR4BEO
This was both informative and hilarious! For more details, click here: LEARN MORE. What’s your take?