क्रीडाताज्या बातम्याशैक्षणिक

एम आय टी ज्यू कॉलेज वाखरीच्या विद्यार्थ्यांनी टेबल टेनिसमध्ये तृतीय क्रमांक मिळवून केले कॉलेजचे नाव उज्ज्वल…

वाखरी (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत एम आय टी ज्यू कॉलेज वाखरीच्या विद्यार्थ्यांनी 19 वर्ष वयोगटात तृतीय क्रमांक मिळवून पहिल्यांदाच टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात कॉलेजचे नाव रोशन केले आहे.

विजेत्या विद्यार्थ्यांची नावे –

  1. पारस शेठ
  2. राजवीर कुलकर्णी
  3. अथर्व चव्हाण
  4. पार्श्व देशमाने
  5. जय पाटील

या यशाबद्दल सर्व विजयी खेळाडूंचे हेड मिस्ट्रेस सौ. शिबानी बॅनर्जी, प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ आणि क्रीडा शिक्षक श्री. प्रवीण पिसाळ यांनी हार्दिक अभिनंदन केले. तसेच त्यांनी पुढील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या यशाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला असून, कॉलेजच्या क्रीडा विभागाचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

अधिक माहिती आणि स्पर्धेच्या तपशीलासाठी संपर्क करा –

  • क्रीडा विभाग, एम आय टी ज्यू कॉलेज वाखरी
  • संपर्क : श्री प्रवीण पिसाळ 976637891.
  • श्री. नारायण देशपांडे 9370996415

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom