डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन
पुरंदावडे (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना माळशिरस तालुका, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी, जनसेवा संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष दादासाहेब जाधव, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन गुलाबराव निंबाळकर यांच्यावतीने बुधवार दि. १ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ वाजता भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन पुणे-पंढरपूर रोड, पुरंदावडे, (भांबुर्डी-जाधववाडी रोड), ता माळशिरस येथे करण्यात आले आहे.
या भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक १,०१,१०१ रु., द्वितीय क्रमांक ७५,१०१ रु., तृतीय क्रमांक ५१,१०१ रु., चतुर्थ क्रमांक २५,१०१ रु., पाचवा क्रमांक १६,०१६ रु., सहावा क्रमांक ९,१०१ रु., सातवा क्रमांक ७,१०१ रु. असे रोख रक्कम स्वरूपात बक्षीस असणार आहे.
या बैलगाडा शर्यतीचे समालोचन सुनील मोरे, पेडगाव हे करणार आहेत. या शर्यतीविषयी सुरेश लोंढे सर ९००४९७४७५२, माजी सरपंच दादासाहेब वाघमोडे ९५११४५४५४६, प्रताप झंजे ९७६६४४४४६९, प्रा. डॉ. मोहन निंबाळकर ९७६६४४४४६९, सरपंच ज्ञानदेव वाघमोडे पाटील ९६०४९७४७५२, पंचायत समिती सदस्य विजय पालवे ९०९६८६३१६९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng