डॉ. बा. ज. दाते प्रशालेचे नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश
नातेपुते (बारामती झटका)
डॉ. बा. ज. दाते प्रशाला, नातेपुते, ता. माळशिरस येथील विद्यार्थी सार्थकराजे जानकर व साई खंडागळे इ. ६ वी या विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेश प्रक्रियेमधून नवोदय विद्यालयामध्ये निवड झाली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक बाबाराजे देशमुख, संस्थेचे चेअरमन डॉ. एम. पी. मोरे, जनरल सेक्रेटरी वीरेंद्रशेठ दावडा, प्रशाला समितीचे सभापती मामासाहेब पांढरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
प्रशालेच्यावतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीणकुमार बडवे, उपमुख्याध्यापक विठ्ठलराव पिसे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संजय पवार आदींसह अनेक मान्यवर, विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng