डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रती जनतेच्या मनातील आदराची भावना पुन्हा एकदा समोर आली
सांगोला (बारामती झटका)
सांगोला येथे नुतन आमदार धंगेकर यांचा सत्कार समारंभ देशाचे नेते खा. शरदचंद्र पवारसाहेब यांच्या व कांग्रेसचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. दुसऱ्याच दिवशी वर्तमान पत्रामध्ये बातम्या झळकल्या. काही वर्तमानपत्रातील बातम्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नावाचा उल्लेखच केला गेला नाही. तो नामोल्लेख चुकुन राहीला असेल असे आम्ही समजतो. कारण, आम्हाला खात्री आहे वर्तमान पत्रे हि निःपक्षपाती काम बजावत असतात. तरीही काही वर्तमानपत्रांतून नाव वगळण्याचा प्रकार झालेला आहे, तो नजरचुकीने झाला असेल असा आमचा तरी समज आहे.
सदर कार्यक्रमामधील वातावरण, देश व राज्य पातळीवरील नेत्यांची बाॅडीलॅंगवेज, डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्याशी दाखवलेली जवळीक हे सर्व जनतेने जवळुन पाहिले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब देशमुख बोलायला उठल्यावरती लोणारी समाजबांधवांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवुन दिलेला प्रतिसाद हा संपूर्ण जनतेनी पाहीला आहे. संपूर्ण कार्यक्रमात फक्त नि फक्त डाॅ. बाबासाहेब देशमुख यांची चर्चा ऐकावयास मिळत होती. यावरुन डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांची जनतेशी नाळ अगदी घट्ट झालेली आहे. याची प्रचिती सदर कार्यक्रमात पहावयास मिळाली. शेवटी एखाद्या ठिकाणी नावाचा उल्लेख चुकुन राहिला असेल तरी जनतेच्या मनात मात्र डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांचे नाव कोरले आहे, हे पहावयास मिळाले.
भाई चंद्रकांत सरतापे, प्रसिद्धी प्रमुख, शेकाप
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng