डॉ. मच्छिंद्र गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक रणजीत मोटे परिवार व मित्र मंडळाच्यावतीने सन्मान संपन्न.
प्रतिकूल परिस्थितीतून डॉक्टर होऊन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे माणसातील देव माणसाचा सन्मान…
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथील सुप्रसिद्ध डॉक्टर मच्छिंद्र भगवान गोरड यांचा वाढदिवसानिमित्त माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रणजीत शेठ मोटे व मित्र परिवार यांच्यावतीने माळशिरस येथील जनसेवा हॉटेलच्या पाठीमागील सुमन बंगला या निवासस्थानी शाल, श्रीफळ, फेटा व हार घालून आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक रणजीत मोटे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर संजयअण्णा मोटे, भांबुर्डी ग्रामपंचायत सदस्य रवीतात्या मोटे, युवा नेते प्रदीप मोटे आदी मोठे परिवारांसह ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भगवानराव थोरात, माजी नगरसेवक उद्योजक संतोषआबा वाघमोडे, सुरेशआबा वाघमोडे, भाजपचे माजी अध्यक्ष पांडुरंग तात्या वाघमोडे, बाळासो निकम, यशवंत मोहिते, सोमनाथ सरगर सर, दीपक टेळे सर, अमर पठाण, हॉलीबॉलचे कर्णधार बाळासाहेब मुजावर, लक्ष्मण वाघमोडे, वाहिद इनामदार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



गोरडवाडी ता. माळशिरस येथील सौ. चांगुना व श्री. भगवान गुलाब गोरड यांचे सर्वसामान्य शेतकरी व मेंढपाळ असणारे कुटुंब. त्यांना चार मुली व एक मुलगा मच्छिंद्र. घरची परिस्थिती बेताची असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉक्टर मच्छिंद्र गोरड यांनी समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. डॉ. मच्छिंद्र गोरड यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यमगर वस्ती गोरडवाडी येथे झालेले आहे. पाचवी ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोटेवस्ती व आठवी ते दहावी गीताई प्रशाला मोटेवस्ती भांबुर्डी येथे शिक्षण झालेले आहे. अकरावी ते बारावी गोपाळराव देव प्रशाला माळशिरस येथे शिक्षण झालेले आहे.
वैद्यकीय डिग्री शिक्षण लोकनेते राजारामबापू पाटील मेडिकल कॉलेज इस्लामपूर सांगली येथे झालेले आहे. जनरल सर्जन एम. एस. अण्णासाहेब डांगे मेडिकल कॉलेज आष्टा येथे अंतिम टप्प्यात आहे. गेल्या सात वर्षापासून मेडिकल क्षेत्रामध्ये डॉक्टर मच्छिंद्र गोरड काम करीत आहेत. त्यांनी अकलूज येथील क्रिटी केअर व डॉ. विवेक गुजर यांच्याकडे अनुभव घेतलेला आहे. त्यांनी माळशिरस येथे डॉक्टर गोरड जनरल अँड सर्जिकल दवाखाना सुरू केलेला आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी फोंडशिरस येथील डॉक्टर वर्षा भाळे यांच्याशी डॉ. मच्छिंद्र यांचा विवाह झालेला आहे. दोघे पती-पत्नी यांनी ग्रामीण भागातील रुग्णांची कोरोना काळात चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. सर्वसामान्य व गरीब रुग्णांचे अल्पदरात उपचार केले जातात. सर्वसामान्य माणसांचे माणसातील देव माणूस म्हणून डॉक्टर मच्छिंद्र गोरड व डॉक्टर वर्षा गोरड भाळे यांच्याकडे पाहिले जात आहे.


आजपर्यंत त्यांनी सव्वा लाख रुग्णांची सेवा केलेली आहे. माळशिरसमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने डॉक्टर सहकारी यांना बरोबर घेऊन लाईफलाईन हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट सुविधा माळशिरस शहरात सुरू केलेली आहे. अशा सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे माणसातील देव असणारे डॉक्टर यांचा सन्मान जेथे बालपणाचे शिक्षण झाले त्या परिसरातील मोटे परिवार यांच्यावतीने करण्यात आला. माजी नगरसेवक रणजीत मोटे व ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भगवान थोरात यांनी सन्मान केला तर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या वाघमोडे यांनी केक भरवला. तसेच उपस्थित सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

