Uncategorizedताज्या बातम्या

डोंबाळवाडी गावात डाळींबाच्या बागेत गांजाच्या झाडांची लागवड करणाऱ्या मालकाला गजाआड करण्यात आले.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या पथकाची धडक कारवाई.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळालेली होती. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका इसमाने शेतामध्ये डाळींबाच्या बागेत गांजाच्या झाडांची लागवड केली आहे. सदर बातमीच्या आधारे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, पोलीस सब इन्स्पेक्टर पुजारी, सहाय्यक पोलीस फौजदार हनुमंत जरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल घोगरे, नवनाथ सोनटक्के, पोलीस नाईक स्वप्निल गायकवाड, राहूल रूपनवर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने, चालक पोलीस कॉन्स्टेबल माने यांचे पथकाने मोजे डोंबाळवाडी, ता, माळशिरस येथील गणपत शिवाजी जाधव रा. डोंबाळवाडी, खुडूस, ता. माळशिरस यांचे शेतातील डाळिंबाचे बागेमध्ये छापा मारून कारवाई केली.

सदर कारवाईमध्ये हिरवा पाला, बोंडे, फांद्या, खोड, मुळे असलेली गांजाची हिरवी ओली 06 झाडे त्याचे एकूण वजन 06 किलो 469 ग्रॅम व त्याची एकूण किंमत 97035 असा मुद्देमाल मिळून आलेला असून सदर छाप्याची कायदेशीर कारवाई पूर्ण करून सदर ठिकाणी मिळून आलेल्या गांजाच्या झाडाबाबत माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 478/2022 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनो व्यापारा परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एन.डी.पी.एस.कायदा) कलम 8( सी) 20 (बी)22 प्रमाणे पोलीस ठाणे कडील सहाय्यक पोलीस फौजदार हनुमंत दत्तात्रेय झरे नेमणूक माळशिरस पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गून्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असून त्यामध्ये इसम नामे गणपत शिवाजी जाधव यांना अटक करण्यात आली. सदर गुन्हाचा पुढील तपास माळशिरस पोलीस ठाणे कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळकर साहेब करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button