तरंगफळच्या माजी सरपंच सौ. रत्नमाला सुजित तरंगे यांना प्रजासत्ताक दिनी वनश्री पुरस्काराने सन्मानित…
सोलापूर ( बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावच्या माजी सरपंच सौ. रत्नमाला तरंगे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2019 जाहीर झाला होता. त्याचा वितरण समारंभ सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे शुभहस्ते पोलीस परेड ग्राउंड, सोलापूर येथे सकाळी नऊ वाजता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ज्येष्ठ विधी तज्ञ शांतीलाल तरंगे, माजी सरपंच महादेव तरंगे, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व माळशिरस तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर, माजी उपसरपंच शशिकांत साळवे, युवा नेते सुजित तरंगे, सामाजिक वनीकरण विभागाचे आटोळे साहेब, बंडगर मॅडम यांचेसह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सौ. रत्नमाला सुजीत तरंगे यांनी तरंगफळ गावात जलसंधारण, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रात भरीव कार्य केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर केला होता. त्यांना या अगोदर अनेक पुरस्कार मिळाले असून मोहिते पाटील परिवाराच्या मार्गदर्शनाखाली तरंगफळमध्ये विविध विकासकामे राबविलेली आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng