Uncategorized

तरंगफळ गावाला कोणी लाईट देतं का लाईट ?, दोन्ही आमदाराच्या आदेशाला अधिकाऱ्यांकडून केराची टोपली

…अन्यथा, विष प्राशन करणार सरपंचाच इशारा

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गाव हे डोंगराळ भागात असून गावाला लाईटच्या बाबतीत वीस ते पंचवीस वर्षांपासूनच समस्याला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळा प्रयत्न करूनही लाईटचा प्रश्न अद्याप सुटला नाही. माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे एक खासदार दोन आमदार आहेत. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी अकलूज येथील आढावा बैठकीमध्ये तरंगफळ गावाचा लाईटचा प्रश्न अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी सांगितला होता. गावांनी सतत पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांचे मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे. म्हणजे दोन्ही आमदारांनी सांगूनसुद्धा अधिकारी आमदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. त्यामुळे केंद्रात व राज्यात सरकार असूनसुद्धा अधिकाऱ्यांवरती धाक राहिला नसल्याची चर्चा तरंगफळवाशीय करीत आहेत.

तालुक्यातील गारवाड, शिपाईवस्ती खुडूस, निमगाव व माळशिरस नवीन सब स्टेशन मंजूर करीत असताना तरंगफळचे नाव नुसते घेतले परंतु माळशिरस सबस्टेशन गावापासून सतरा ते अठरा किलोमीटर असून 25 ते 30 वर्षांपूर्वीची जुनी मेन लाईन आहे. सतत विद्युत प्रवाह सुरळीत होत नाही, सतत घोटाळा झालेला असतो. गावाला आठ तासांपैकी दोन तासही लाईट मिळत नाही. उन्हाळा चालू असताना स्वतःच्या मुलांप्रमाणे पिकांना जपलेले असताना डोळ्यासमोर पिके जळू लागलेले आहेत. परंतु, निर्ढावलेले अधिकारी मात्र वारंवार सांगूनही दुर्लक्ष करीत आहेत. गारवाड व खुडूस शिपाई वस्ती हे दोन सबस्टेशन गावाच्या लगत पाचशे मीटरवर असून देखील तेथून लाईट मिळत नाही, ही मात्र शोकांतिका आहे. ग्रामस्थांच्यावतीने उपोषणाचे निवेदन देऊनसुद्धा अधिकार्‍यांना जाग येत नाही.

तरंगफळ ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्याचे दोन्ही आमदार यांना पत्रव्यवहार केला. अधिकाऱ्यांना लाईट जोडण्यासाठी शिपाईवस्ती व निमगाव गारवड या ठिकाणाहून लाईट जोडण्यास सांगितले होते. परंतु, तसे झाले नाही. ग्रामपंचायतने महावितरण ऑफिसला उपोषणाचे पत्र दिले होते. परंतु, महावितरणने दोन दिवसांत लाईन जोडतो असे सांगितले परंतु, अद्याप काही झाले नाही. येत्या दोन दिवसांत लाईट जोडली नाही तर अकलूज उपविभागीय कार्यालय या ठिकाणी जाऊन विष प्राशन करणार आहे. – नारायण तरंगे, सरपंच, तरंगफळ ग्रामपंचायत

स्वतःच्या मुलांप्रमाणे पिके जोपासली. परंतु, आठ तासातील दोन ताससुद्धा लाईट चालत नसल्यामुळे विहिरीत नुसते पाणी बघायचे व स्वतःच्या डोळ्यादेखत पिके जळताना पाहायचे, हे नकोसे झाले आहे. त्यामुळे कर्ज काढलेले फिटत नाही. त्यामुळे जीवन नकोसे झाले आहे. – रावसाहेब तरंगे, शेतकरी, तरंगफळ

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button