Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

तरंगफळ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलची वार्ड क्रमांक तीन मध्ये प्रचारात आघाडी.

श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार तरंगे पद्मिनी नारायण, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मारुती कांबळे, जगुबाई मारुती जानकर यांचा होम टू होम प्रचार सुरू

जगूबाई जानकर यांचा पाखराची गोफन फिरवून मशागतीचा ट्रॅक्टर चालवून गावाचा कारभार चालवण्याचा मनसुबा

तरंगफळ ( बारामती झटका )

तरंगफळ ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच पद व ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार तरंगे पद्मिनी नारायण यांचे चिन्ह कपबशी असून त्यांच्यासोबत वार्ड क्रमांक चार मधील पॅनलचे अधिकृत उमेदवार पांडुरंग मारुती कांबळे यांचे चिन्ह ट्रॅक्टर व जगूबाई मारुती जानकर यांचे चिन्ह छताचा पंखा असून या उमेदवारांनी होम टू होम प्रचार करून मतदारांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. सर्वात वयस्कर असणाऱ्या “आजीबाईची गोफन” या नावाने सोशल मीडियावर सुप्रसिद्ध असणाऱ्या जगूबाई जानकर यांनी पाखराची गोफन फिरवून लक्ष वेधून घेतलेले होते. महिला दिनाच्या दिवशी मशागतीचा ट्रॅक्टर चालवून महिला सबलीकरणाचा आदर्श घालून दिलेला होता. उतरत्या वयाबरोबर आजीबाई पणजी झालेल्या आहेत. तरीसुद्धा गावाचा कारभार चालविण्याचा मनसुबा असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री व शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते जगूबाई जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरलेला होता. जगूबाई जानकर ह्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्था तरंगफळचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर यांच्या मातोश्री आहेत. जगुबाई जानकर यांचा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असतो. धार्मिक कार्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. त्यांनी मायाक्का चिंचणीचे मंदिर घराच्या शेजारी बांधलेले आहे. मारुती जानकर हयात असताना जगूबाई यांनी एक वेळेस मायाक्का चिंचणीच्या सवाष्णीचा कार्यक्रम केलेला होता. त्यामध्ये उपस्थित सर्व महिलांना साड्या वाटप केलेल्या होत्या. टेम्पो भरून साड्या आणलेल्या होत्या.

जागतिक अपंग दिन व इतर कार्यक्रमांमध्ये जगुबाई जानकर यांचा नेहमी सहभाग असतो. माळशिरस तालुक्यामध्ये सर्वात वयस्कर जगूबाई जानकर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात सदस्य पदासाठी उभ्या आहेत. त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button