महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर (बारामती झटका)
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार दि. 29 मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
गुरूवार दि. 29 मे 2025 रोजी सकाळी 7.45 वाजता सांताक्रूझ विमानतळ, येथून विमानाने सोलापूरकडे प्रयाण करतील. सकाळी 08.30 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व सकाळी 08.35 वाजता मोटारीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी 08.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आगमन, सकाळी 09.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक, सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच भूमी अभिलेख विभाागाची आढावा बैठक, दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्थानिक आमदार महोदय यांचे समवेत बैठक, दुपारी 01.00 ते 01.45 वाजता राखीव, दुपारी 02.00 वाजता ड्रीम पॅलेस, पोलीस कल्याण केंद्र, सेवासदन शाळेसमोर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4.00 वाजता एस.टी. स्टँडजवळ सोलापूर जिल्हा भाजप कोअर कमिटी बैठक, सायंकाळी 5.00 वाजता शिवस्मारक, एस. टी. स्टँडजवळ येथे राखीव, सायंकाळी 5.30 वाजता मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण करतील, सायंकाळी 5.45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने सोलापूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



