तांदुळवाडी येथील वार्ड क्र. ५ मध्ये डीपीचे उदघाटन
तांदुळवाडी (बारामती झटका)
तांदुळवाडी ता. माळशिरस येथील वार्ड क्र. ५ मधील वीज पुरवठा करणाऱ्या डीपीचे आज दि. १५/०४/२०२३ रोजी उद्घाटन करण्यात आले. वार्ड क्र. ५ मध्ये अनेक वर्षांचा वीज प्रश्न ॲड. नागेश काकडे यांनी सोडविला आहे. यांच्या प्रयत्नातून वार्डामध्ये दोन डीपी चे काम पूर्ण झाले. त्याबद्दल वार्ड क्र. ५ मधील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे ॲड. नागेश काकडे यांचा सन्मान करण्यात आला.
ॲड. नागेश काकडे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून शेतकऱ्यांचा दहा वर्षाचा वीज प्रश्न मार्गी लावला. शेतीला वीजपुरवठा व्यवस्था झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी गावातील अनेक मान्यवर व एम.एस.सी.बी. चे अधिकारी उपस्थित होते. आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू, असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng