स्थानिक स्वराज्य संस्थेत दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळावे – गोरख जानकर

माळशिरस (बारामती झटका)
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत दिव्यांगांना आरक्षण मिळावे, अशी मागणी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर यांनी केली आहे. दिव्यांगांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेत दिव्यांगांचा प्रतिनिधी असणे गरजेचे आहे तरच दिव्यांगांचे प्रश्न सुटू शकतील. दिव्यांगांना न्याय मिळेल आणि दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी होतील.
दिव्यांगांना आरक्षण नसल्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेत दिव्यांगांचे प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रश्न कोणीही उपस्थित करू शकत नाही म्हणून, आमच्या हक्काचा प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेत जाण्यासाठी दिव्यांगांना आरक्षण मंजूर करून येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला प्रतिनिधित्व मिळावे, अशी आमची दिव्यांग बांधवांची मागणी आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



