तिरवंडी गावात विविध विकासकामांचा धुमधडाक्यात उद्घाटन समारंभ संपन्न झाला….
आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. रामभाऊ सातपुते यांची सरगर परिवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…
तिरवंडी (बारामती झटका)
विधान परिषदेचे युवा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते तिरवंडी, ता. माळशिरस येथे विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला. त्यामध्ये तिरवंडी-मेडद रस्ता, तिरवंडी बंधारा रस्ता कॅनॉल मार्गे, संत बाळूमामा मंदिर सभा मंडप भूमिपूजन, अशा अनेक विकासकामांचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, प्रतापराव पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव पवार, भानुदास राऊत, जिल्हा परिषद माजी सदस्य अरुण तोडकर, युवा नेते राहुल बापू वाघमोडे, तिरवंडीचे सरपंच नानासाहेब वाघमोडे सर, पुरंदावडे गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच देविदास उर्फ बाळासाहेब ढोपे, अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील मॅडम, उप अभियंता डाके साहेब, मस्के साहेब, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेव उर्फ एमडी सरगर, तिरवंडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष वाघमोडे, किशोर वाघमोडे सर, नाना पाटील, संत बाळूमामा मंदिर समितीचे सर्व सदस्य, हरी वाघमोडे, रामभाऊ धायगुडे, राहुल वाघमोडे, शंकर माने, संजय सरगर, बापूराव सरगर, मच्छिंद्र वाघमोडे यांच्यासह तिरवंडी गावचे आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांनी तिरवंडी गावातील विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा केल्यानंतर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेव उर्फ एमडी सरगर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जेष्ठ नेते ज्ञानेश्वर सरगर व सोसायटीचे चेअरमन संतोष सरगर व सर्व सरगर परिवारातील सदस्यांनी दोन्ही आमदार व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांचा सरगर परिवार यांच्यावतीने गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेव उर्फ एमडी सरगर यांनी सन्मान केलेला होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further reading, check out this link: READ MORE. Let’s discuss!