Uncategorized

थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवारांनी चिरीमरी घेऊन सरपंच पदाची प्रतिष्ठा कमी करू नये.

राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांनी म्हातारी गेल्याचे दुःख नाही मात्र, काळ सोकावून देऊ नये, सर्वसामान्य जनतेची इच्छा

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात 35 ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत 203 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज वैध झालेले आहेत. थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. सरपंच पदाची उमेदवारी दाखल करून चिरीमिरी घेऊन लोकनियुक्त सरपंच पदाची प्रतिष्ठा कमी करून घेऊ नये, असा सर्वसामान्य जनतेचा सूर आहे.

प्रत्येक गावातील राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांनी लोभापायी सरपंच पदाची उमेदवारी दाखल करणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी लोणी लावत न बसता म्हातारी गेल्याचे दुःख नाही मात्र, काळ सोकावून देऊ नये अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. अर्ज मागे घेण्याकरता उमेदवार आर्थिक रसद देण्याऐवजी गावातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडचणी व गरजा भागवण्याकरता वायफट निधी खर्च न करता समाज उपयोगी कामे करावी, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी तिरवंडी 9, कचरेवाडी 5, मोठेवाडी माळशिरस 4, तरंगफळ 8, इस्लामपूर 7, वेळापूर 10, उघडेवाडी 2, धानोरे 6, बागेवाडी 6, आनंदनगर 5, यशवंतनगर 4, संगम 6, जांभूड 5, माळेवाडी बोरगाव 9, नेवरे 7, कोळेगाव 4, फळवणी 4, काळमवाडी 4, खंडाळी दत्तनगर 6, सदाशिवनगर 10, पुरंदावडे 9, लोंढे मोहितेवाडी 8, गुरसाळे 6, तांबेवाडी 3, मेडद 6, उंबरे दहिगाव 5, पळसमंडळ 2, तामशीदवाडी 5, मारकडवाडी 5, चांदापुरी 6, पठाणवस्ती 5, निमगाव 6, पानीव 5, चौंडेशरवाडी 6, पिसेवाडी 6 अशा उमेदवारांनी सरपंच पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

उघडेवाडी व पळसमंडळ या दोन गावांमध्ये समोरासमोर थेट जनतेतील सरपंच पदाची लढत लागलेली आहे. यामधील अनेक उमेदवारी अर्ज पॅनल मधील असून बरेचसे पूरक अर्ज आहेत. त्यामुळे पॅनल मधील निर्णयानंतर पूरक अर्ज काढून घेतले जातात मात्र, पॅनलच्या व्यतिरिक्त असणारे उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना कोणत्या हेतूने भरलेला आहे, जनतेचे हित का ? स्वहित ?, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

बुधवार दि. 07/12/2022 रोजी 03 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button