कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारणसामाजिक

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. राजेंद्र काकडे यांच्या चौकशीला सुरुवात…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांची नियुक्ती, पदोन्नती व सचिव पदाच्या कार्यकालातील प्रशासकीय कामकाज व कामांची चौकशी होण्याचे आदेश पणन संचालकाने दिले…

अकलूज (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे. सचिव श्री. राजेंद्र काकडे यांची नियुक्ती, पदोन्नती व सचिव पदाच्या कार्यकाळातील प्रशासकीय कामकाज व कामांची चौकशी होण्याबाबत बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे रीतसर तक्रार दिलेली होती. सदरच्या तक्रारीच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पणन मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रधान सचिव यांच्याकडे पिडीत शेतकरी व्यापारी, आडत व्यापारी, गाळेधारक व माजी संचालक यांच्या भावनेचा आदर करून तक्रारी अर्ज दिलेला होता.

श्रीनिवास कदम पाटील यांनी दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, ता. माळशिरस या बाजार समितीवर सध्या सचिव पदावर कार्यरत असणारे श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती नियुक्ती व त्यांना मिळालेली पदोन्नती अथवा बढती याची सखोल चौकशी करून सचिव कार्यकालातील प्रशासकीय कामकाज व कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज व दुय्यम बाजार समिती नातेपुते या बाजार समितीच्या अंतर्गत केलेल्या कामांची चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कठोर कारवाई करून शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला असल्यास व्यक्तिगत प्रॉपर्टी मधून वसूल करावा, अशी आपणांस भारताचा सुज्ञ नागरिक या नात्याने नम्र व कळकळीची विनंती आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांनी सुरुवात कोणत्या पदापासून केलेली आहे, त्यांना सचिव पदाची बढती नियमांची पायमल्ली करून देण्यात आलेली आहे, याची खात्री करून घ्यावी‌. सचिव पदावर आपल्या पणन मंडळाची शिफारस आहे का, ते तपासून घ्यावे. सचिव कार्यकालामध्ये प्रशासकीय कामकाज करीत असताना नियमांची पायमल्ली झालेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज व उपसमिती नातेपुतेच्या आवारामधील रस्ते, नवीन गाळे, जुन्या गाळ्यांना व इमारत गोडाऊन यांना डागडुजी, दुरुस्ती, रंगरंगोटी अशी कामे करीत असताना चालू डीएसआर प्रमाणे रेटमध्ये तफावत आढळल्यास सदरच्या ठेकेदारास व एजन्सी काळ्या यादीत टाकून अतिरिक्त रक्कम वसूल करावी. अकलूज व नातेपुते येथील गाळ्यांच्या लिलाव धारकांकडून मिळालेली रक्कम व कागदोपत्री दाखवलेली रक्कम तपासून पाहणे गरजेचे आहे. व्यापारी गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे. सचिव पदावर कार्यरत झाल्यापासून आर्थिक पत्रके तपासून घ्यावी. कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, हंगामी कर्मचारी व कायमस्वरूपी कर्मचारी यांच्या मान्यतेच्या आदेशाच्या प्रति तपासाव्यात. सर्व व्यापारी गाळेधारकांच्या कराराच्या प्रति तपासाव्यात. सचिव कार्यकालामधील लेखापरीक्षण अहवाल, लेखापरीक्षण अहवालातील शक व त्यांच्या केलेल्या पूर्ततेची कागदपत्रे तपासून पहावीत. अशा सर्व बाबींचा बाबनिहाय अभ्यास करून सदरच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी आपणांस विनंती आहे. आपण निपक्षपाती चौकशी कराल, अशी अशा असल्याने आपणाकडे रीतसर तक्रारी अर्ज दिलेला आहे. आपणाकडून विलंब अथवा टाळाटाळ होत असल्यास आपणांस हे सर्व माहीत आहे, असे समजून आपल्याही विरोधात तक्रार दाखल करण्याची दुर्दैवी वेळ येऊ देऊ नये, अशी आपणांस माझी पुन्हा कळकळीची व निम्र विनंती आहे. अशा पद्धतीचे पत्र दिलेले होते.

सदरच्या तक्रारी पत्राच्या अनुषंगाने पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा निबंधक सोलापूर यांच्याकडे चौकशीसाठी पाठवलेले होते. जिल्हा कार्यालयाने सहाय्यक निबंधक माळशिरस यांच्याकडे चौकशीसाठी पत्रव्यवहार केलेला आहे.
श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांच्या कार्यप्रणालीची चौकशी सुरू झालेली आहे. दि. 31/5/2025 रोजी श्री. राजेंद्र तुकाराम काकडे सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यामुळे चौकशी निपक्षपाती होईल, असा विश्वास तक्रारदार श्रीनिवास कदम पाटील यांना आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीमध्ये सचिव नेमणुकीचा विषय होता. सदरच्या विषयांमध्ये अनुभवी सचिव पदाची नेमणूक व्हावी असा विषय होता. पणन संचालक यांना विनंती आहे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव निपक्षपाती व भ्रष्टाचार मुक्त असावा, अशी माळशिरस तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, गाळेधारक यांची मागणी आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom