तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये एमआयटी विश्वशांती गुरुकुलचे यश

पंढरपूर (बारामती झटका)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर तालुकास्तरीय ॲथलेटिक्स बॅटन रिले स्पर्धांमध्ये वाखरी येथील विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विश्र्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थिनी दिव्या लोकरे, श्रेया पवार, वैष्णवी डांगे, समिक्षा दांडगे, आणि श्रावणी भोसले यांनी दमदार खेळी करत सांघिक प्रकारात विजेतेपद मिळवले.
तसेच २०० मीटर धावणे या स्पर्धेत दिव्या लोकरे हिने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला. या यशामागे विद्यार्थिनींच्या मेहनतीबरोबरच प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहनही मोलाचे ठरले. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका शिबानी बॅनर्जी, प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ आणि क्रीडा शिक्षक प्रवीण पिसाळ यांनी विद्यार्थिनींचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. एमआयटी विश्वशांती गुरुकुलने यापूर्वीही विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये आपली वेगळी छाप पाडली असून, या यशामुळे संस्थेचा नावलौकिक आणखी वाढला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



