दहिगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीकडून सौ. संगीताताई शेळके यांनी निवडणूक लढवावी, मतदारांची मागणी.
गुरसाळे पंचायत समिती गणात मतदारांच्या विकासकामांच्या अपेक्षा पूर्ण करून भाजप पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम केले.
पत्नीच्या राजकारणाला पती उद्योजक दत्तात्रय शेळके यांच्या समाजकारणाची साथ मिळत असल्याने राजकारण व समाजकारण पहावयास मिळत आहे.
दहिगाव ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गट रचना निश्चित होऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर झालेले आहे. त्यामध्ये दहिगाव जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. गतवेळेस गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये भाजपच्या सौ. संगीताताई दत्तात्रय शेळके यांनी गुरसाळे पंचायत समिती गणात मतदारांच्या विकासकामांच्या अपेक्षा पूर्ण करून भारतीय जनता पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम केले आहे. दहिगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीकडून संगीताताई दत्तात्रेय शेळके यांनी निवडणूक लढवावी, अशी जिल्हा परिषद गटातील मतदारांची मागणी आहे
गेल्या पाच वर्षांमध्ये गुरसाळे पंचायत समिती गणाचे प्रतिनिधित्व सौ. संगीताताई दत्तात्रय शेळके यांनी केलेले होते. गणातील व्यक्तिगत व सार्वजनिक कामे करीत असताना मनामध्ये कुठलाही स्वार्थ अथवा हेतू ठेवलेला नाही. सर्वसामान्य जनतेच्या लोकोपयोगी कामे केलेली आहेत. गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये गुरसाळे, शिंदेवाडी, डोंबाळवाडी, हनुमानवाडी, तांबेवाडी, एकशिव, कुरबावी, देशमुखवाडी अशी गावे येत होती. सौ. संगीताताई शेळके यांनी पंचायत समिती सदस्य यांचा असणारा निधी व गणातील शासकीय योजना गणामध्ये असणाऱ्या गावांशिवाय इतर गावांमध्ये निधी दिलेला नाही. एकही काम त्यांच्या पतीने अथवा नातेवाईकांनी केलेले नाही. राजकारण करून पैसे मिळवणे, हा उद्देश नसून सर्वसामान्य जनतेची सेवा व समाजकार्य करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मतदार संघामध्ये त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी त्या पक्षाच्या भूमिकेमध्ये कायम निष्ठेने राहिलेल्या आहेत. माळशिरस तालुक्यात भाजप व राष्ट्रवादीच्या पक्ष बदलांमध्ये पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या वेळी भाजपच्या सदस्यांसोबत संगीताताई शेळके यांनी आपली भूमिका भाजपच्या गटासोबत ठेवलेली होती, यातून त्यांची पक्षनिष्ठा दिसून येत आहे.
उद्योजक दत्तात्रेय शेळके यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सामाजिक कार्यात सामाजिक बांधिलकी जपत अनेक जनहिताची कामे केलेली आहेत. कोरोनासारख्या महाभयंकर संसर्ग रोगाच्या कालावधीमध्ये रुग्णांना व नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम शेळके दांपत्य यांनी केलेले आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये दवाखान्यात ॲडमिट असणाऱ्या रुग्णांना जेवणाचे डबे, औषध उपचार करण्याकरता सहकार्य केलेले आहे. सर्वसामान्य व गोरगरीब लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लॉकडाऊनच्या काळामध्ये सहकार्य केलेले आहे. अनेक गावांमध्ये जत्रा, यात्रा, सण, उत्सव, कुस्ती मैदान, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव अशावेळी आर्थिक सहकार्य करून अनेक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहून तरुण कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला पाठबळ दिलेले आहे. उद्योग व्यवसाय करीत असताना उद्योजक दत्तात्रेय शेळके यांनी प्रतिकूल परिस्थिती जवळून पाहिलेली असल्याने समाजामध्ये वावरत असताना सर्वसामान्य लोकांना कायम मदतीचा हात असतो. उद्योजक दत्तात्रेय शेळके यांच्या सामाजिक कार्यावर तरुण खुश असल्याने कायम तरुण वर्गाची फौज सोबत असते. स्वच्छ चारित्र्य व स्वच्छ प्रतिमा असलेले निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून उद्योजक दत्तात्रय शेळके यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात स्वखर्चाने अनेक समाजहिताची कामे केलेली आहेत. किती तरी ठिकाणी पाण्याची अडचण सोडविलेली आहे. तरुणांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धा, कुस्ती मैदान व अनेक खेळांना भरपूर सहकार्य असते, यामध्ये त्यांचे मोठे योगदान असते.
दहिगाव चाळीस जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. धर्मपुरी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारण तर दहिगाव पंचायत समिती गण सर्वसाधारण आरक्षण पडलेले आहे. या जिल्हा परिषद गटात धर्मपुरी, गुरसाळे, हनुमानवाडी, डोंबाळवाडी, देशमुखवाडी, शिंदेवाडी, दहिगाव, मोरोची, कारूंडे अशी गावे आहेत. या सर्व गावांमध्ये सामाजिक कार्यातून शेळके दांपत्य संगीताताई शेळके व उद्योजक दत्तात्रय शेळके यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले आहे. त्यामुळे मतदार संघातील जनतेची मागणी आहे, भाजपमधून सौ. संगीताताई दत्तात्रय शेळके यांनी जिल्हा परिषद दहिगाव गणातून निवडणूक लढवावी.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
You have noted very interesting details! ps decent
website.Raise your business