ताज्या बातम्यासामाजिक

दादासाहेब हुलगे यांना राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार प्रदान….

माळशिरस (बारामती झटका)

पत्रकार भवन पुणे येथे हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड यांच्यावतीने राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार आमदार रविंद्र धंगेकर यांच्या शुभहस्ते संघर्षयात्री दादासाहेब हुलगे यांना सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक तथा माजी अध्यक्ष आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉ‌. श्रीपाल सबनीस आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, राज्य मागासवर्ग आयोग सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, उद्योजक डॉ. विश्वासराव सोंडकर, ओबीसी नेते बाळासाहेब सानप, महिला नेत्या डॉ. उज्वला हाके, संस्थेचे अध्यक्ष सुनिल फडतरे, आयोजक हनुमंत धायगुडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने दादासाहेब हुलगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालों की कभी हार नही होती, या पद्यपंक्तीचा संदर्भ देत आपला संघर्षमय प्रवास सांगितला‌. समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद घेऊन सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो असे मत यावेळी त्यांनी भाषणातून व्यक्त केले.

त्यानंतर आमदार रविंद्र धंगेकर यांनी त्यांच्या मनोगताच्या प्रारंभी सर्व पुरस्कारार्थींना व संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देऊन सध्याचे शिक्षणाचे होणारे बाजारीकरण थांबावे अशी इच्छा व्यक्त केली. सर्वांनी सेवाभावी वृत्तीने एकमेकास सहाय्य करावे, दिव्यांगाकडूनही खूप प्रेरणादायी गोष्टी घेण्यासारख्या आहेत असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशंसा केली. पुरस्कार हे सर्वांनाच दिले जात नाहीत तर, समाजात ज्यांचे काम उल्लेखनीय आहे, अशाच प्रतिभावंत व्यक्तिचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. संस्थेने अशाच प्रकारे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. अशा प्रतिभावंताचा शोध घेऊन पुरस्कारासाठी निवड केली, अशा प्रतिभावंतांचा पुरस्कार देण्याचे भाग्य मला लाभले असे, गौरवोदगार त्यांनी काढले. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सखोल मार्गदर्शन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button