दिल्ली येथील संसदभवन मधील लोकसभा सभागृहातील कामकाज पाहण्याची संधी मिळाली.” गल्ली ते दिल्ली “

माढा लोकसभेचे कार्य तत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी सभागृहात विशेष निमंत्रित प्रवेशिका उपलब्ध करून दिली..
दिल्ली (बारामती झटका)
दिल्ली येथील संसदेमधील लोकसभा सभागृहातील सभापती, उपसभापती, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विविध राजकीय पक्षांचे खासदार यांचे सभागृहातील कामकाज पाहण्याची संधी माढा लोकसभेचे कार्य तत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी सभागृहात विशेष निमंत्रित प्रवेशिका बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर महाराष्ट्र राज्य यांना मंगळवार दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजी संधी उपलब्ध करून दिलेली होती त्यावेळी लोकशाही न्यूजचे अभिराज उबाळे, झी 24 तास न्यूज सचिन कसबे, साम टीव्ही,भारत नागणे, TV 9 न्यूज रविराज लव्हाळे उपस्थित होते.



भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भव्य दिव्य संसद भवनामध्ये देशाचे राजकारणाचा व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या निर्णयाचा समाज उपयोगी कामकाज सुरू असते. ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असताना खेडोपाडी गावात वाड्यावर गल्लोगल्ली फिरून पत्रकारिता करावी लागते गल्ली ते दिल्ली असा पत्रकारितेचा प्रवास करण्याचा योग पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे आलेला आहे.

श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांनी 2008 साली पाक्षिक साळुबाई वार्तापत्र सुरू केलेले होते. महिन्याच्या 01 व 15 तारखेला महिन्यातून दोनदा प्रकाशित केले जात होते. जनतेच्या मनामधील बातमीमुळे अल्पावधीत लोकप्रिय वृत्तपत्र ठरलेले होते, वाचकांचीही मोठ्या मागणी होती. पंधरा दिवस वाट पाहावी लागत आहे, यासाठी साप्ताहिक सुरू करून आठवड्यातून प्रकाशित करावे म्हणजे आठ दिवसातील घडामोडी वाचायला मिळतील, वाचकांच्या या आग्रहास्तव बारामती झटका 2009 साली साप्ताहिक सुरू केले. दर गुरुवारी बारामती झटका साप्ताहिक प्रकाशित केले जात होते. प्रत्येक गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या बारामती झटका साप्ताहिक यामधून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, लोकप्रतिनिधी यांचे चुकीचे निर्णय, शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यांचे ताशेरे ओढले जायचे. यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत होता. अशा अनेक कारणांमुळे बारामती झटका साप्ताहिक वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारे साप्ताहिक ठरलेले होते.

बदलत्या काळामध्ये वाचकांची अपेक्षा वाढलेली होती. काळानुसार बदल केला आणि बारामती झटका वेब पोर्टल ऑनलाइन सुरू केले. बारामती झटका वेब पोर्टल यांनी समाजामध्ये घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडिया, अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप, कॅम्पुटर, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा विविध साधनांमधून घडलेली घटना काही वेळामध्ये समाजात पोहोचविण्याचे काम केलेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेब पोर्टल यांनी चांगले काम केले.

बारामती झटका वेब पोर्टल वाचकांची व सर्वसामान्य जनतेची अपेक्षा उंचावली. युट्युब चॅनेल काढण्याच्या जनतेकडून अपेक्षा व इच्छा व्यक्त झाल्या. त्यानुसार बारामती झटका यूट्यूब चॅनल सुरू केले.

चित्रफिती मार्फत घडलेल्या घटनेचे दर्शन जनतेला व सर्वसामान्य नागरिकांना जिथे कुठे असतील, प्रवास, घर, शेतात, व्यवसायाच्या ठिकाणी अशा अनेक ठिकाणी घटनेची माहिती मिळत असल्याने अनेक लोकांनी बारामती झटका यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला आहे. थेट सभासद पन्नास हजार झालेले आहेत. वेब पोर्टल चे वाचन 1 कोटी 85 लाखाच्या वर गेलेले आहेत. तर युट्युब चॅनेल पाहणाऱ्या प्रेक्षकांची 93 लाख 49 हजार संख्या झालेली आहे.

साळुबाई वार्तापत्र पाक्षिक, बारामती झटका साप्ताहिक, बारामती झटका वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आवाज व हक्काचे व्यासपीठ निर्माण करणारे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी देशाच्या संसद भवन मधील कामकाजाची पाहणी केलेली आहे.

सभागृहांमध्ये लोकप्रतिनिधी विषयाची मांडणी करीत असतात. विषय चुकीचा वाटला तर विरोध करतात. विषय चांगला वाटला तर बाके वाजवून स्वागत करतात. संसद भवन मधील लोकसभा सभागृहामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे आल्हादायक वातावरण, स्वच्छता शांतता, याचबरोबर लोकप्रतिनिधींची विषयाची पोट तिडकीने मांडणी असे अनेक मुद्दे पाहावयास व ऐकावयास मिळत असतात. देशाच्या राजकारणातील सर्वोच्च सभागृह संसद भवन आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीत सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यामुळे मिळालेली आहे.

दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना व जनतेला राहण्याकरता सुसज्ज व वातानुकूलित महाराष्ट्र सदन जुने व नवे अशी दोन भव्य दिव्य इमारती आहेत सदरच्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभा केलेले आहेत महाराष्ट्र सदन मध्ये राहण्याचा योग आलेला आहे.

संसद भवन महाराष्ट्र सदन याचबरोबर देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार, परिवहन व रस्ते विकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, पुरातत्व मंत्री नामदार जयकिशन रेड्डी, सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले, खासदार श्रीनिवास पाटील खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार बंडू पंत जाधव, खासदार शिवाजीराव आढळकर पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार राहुल कुल यांच्या भेटी झाल्या तर संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आगमन होताना 50 फुटावरून व सोनियाजी गांधी यांचे 10 फुटावरून पाहण्याचा योग आला. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा विधान परिषद अशी सभागृह पाहिल्यानंतर संसदेतील लोकसभा सभागृह पाहण्याची माढा लोकसभेचे कार्य तत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यामुळे सुवर्णसंधी मिळालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Fantastic insights! Your perspective is very refreshing. For more details on this topic, visit: EXPLORE FURTHER. What do others think?
Aloha, makemake wau eʻike i kāu kumukūʻai.