Uncategorized

दिल्ली येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

दिल्ली (बारामती झटका)

पुण्यश्लोक महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 298 वा जन्मोत्सव सोहळा दि. 31 मे 2023 रोजी दिल्ली येथे संपन्न झाला.
कर्तबगार स्त्री तू, चालविला माळव्यांचा कारभार,
तुझ्या अफाट दानधर्माने, झाला सामान्याचा उद्धार,
पुण्यश्लोक तुझ्या पुढे, सारे नतमस्तक होती,
हे राजयोगिनी, नमन तुझं चरणी,
कर्तुत्व, नेतृत्व, जातृत्वाचा, त्रिवेणी संगम,
राजराणी असूनही राजयोगिनी झाली,
पुण्याची कामे करून, पुण्यश्लोक म्हणून जनमानसी अमर झाली…

कुशल प्रशासक आणि प्रजानिष्ट राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात गौरवले गेले आहे. प्रजेची उन्नती व विकास, संस्थांना सामाजिक शांतता, समता, न्याय, स्वातंत्र्य, या मूलभूत मानवी मूल्यांना अहिल्यादेवींनी आपल्या प्रशासन व्यवस्थेत प्रधान्य दिले. आणि जनतेच्या मनात आधाराचे स्थान निर्माण केले. प्रजेच्या कल्याणासाठी अविरत धडपड करणाऱ्या पुण्यश्लोक राजयोगिनी राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

माननीय जानकर साहेब यांनी पहिली जयंती चौंडी येथे सुरु करून अहिल्यादेवींचे विचार 18 पगड जातीपर्यंत पोहोचण्याचा काम केले. त्यानंतर मुंबई या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. जयंती साजरा होऊ लागल्या. साहेबांचे विचार, देवीच्या आदर्शाचा विचाराचा, जागर झाला पाहिजे. आता दिल्ली या ठिकाणी जयंती साजरी करून गडकरी साहेबांनी जानकर साहेबांचे कौतुक केले. गडकरी साहेबांनी सांगितले, माझ्या आईने अहिल्यादेवी होळकर यांच्यावर एक पुस्तक लिहिले होते‌. ते मी कॉलेजला असताना वाचले आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक क्षेत्रांमध्ये काम केले आहे. शैक्षणिक असेल, उद्योग धंद्यात असेल, किंवा देवधर्मात असेल असे सांगितले. जो उत्तरेकडील राज्यामध्ये राज करेल तो देशावर राज करतो. गडकरी साहेबांनी धनगर समाजाच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविल्या. समाजाने शेळी, मेंढी सोडून इतर व्यवसायाचा विचार केला पाहिजे तरच समाजाची प्रगती होईल. ताईंनी पक्षाला सहकार्य करेल, तुम्ही मेहनत घ्या, आम्ही साथ देऊ. राष्ट्रीय समाज पक्ष हा माझे माहेरघर आहे, असे सांगितले. येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढेल.

या कार्यक्रमासाठी ना. नितीनजी गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री भारत सरकार, श्रीमती पंकजाताई गोपीनाथ मुंडे माजी ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, ना. महादेवजी जानकर साहेब संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री, हिंगोलीचे खासदार रमेश पाटील, रासेफ प्रमुख श्री. अक्कीसागर साहेब, सुनीता पाल (माजी राज्यमंत्री, उत्तर प्रदेश), काशिनाथ शेवते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष पै. रणजीत सुळ, जिल्हा सहसचिव श्री. वैजिनाथ पालवे, जिल्हा प्रवक्ते श्री. संजय वलेकर सर, प्रभारी श्री. शंकर शेंडगे, तालुकाध्यक्ष श्री. नारायण देवकाते, श्री. संतोष मासाळ उपाध्यक्ष युवक आघाडी, बालवक्ता कु. मंगेश झंजे आदींसह इतर सर्व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button