दि मॉडेल हायस्कुलच्या परिधि देशमुख व सार्थक गिरमेयांचे शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान

माळीनगर (बारामती झटका)
दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथील इ. ५ वी मधील विद्यार्थिनी कु. परिधि संजय देशमुख हिने जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत १९ वे तर इ. ८ वी मधील चि. सार्थक सत्यजित गिरमे याने जिल्हा गुणवत्ता यादीत ३३ वे स्थान मिळवून शाळेची उज्वल परंपरा कायम ठेवली.शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवल्याबद्दल प्रशालेत विद्यार्थ्यांचा प्रशालेचे प्राचार्य प्रकाश चवरे, उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार, पर्यवेक्षक रितेश पांढरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रशालेचे जेष्ठ शिक्षक राजीव देवकर, संजय पवार, मार्गदर्शक शिक्षक नवनाथ गायकवाड, अभिजीत हेगडे, सचिन आतकर, संदीप देशमुख, महेश शिंदे, शिक्षिका आशा रानमाळ, मनीषा नलावडे, शोभा जोशी, सविता पोटे, सुवर्णा पोळ आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे, व्हा. चेअरमन नितीन इनामके, सेक्रेटरी प्रकाश गिरमे, खजिनदार पृथ्वीराज भोंगळे, संचालक अशोक गिरमे, अनिल रासकर, ॲड. सचिन बधे, रत्नदीप बोरावके, अजय गिरमे, डॉ. अविनाश जाधव, कल्पेश पांढरे, दिलीप इनामके, लीनाताई गिरमे, ज्योतीताई लांडगे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng