दि सासवड माळी शुगर कारखान्याचा ९० वा गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न
माळीनगर (बारामती झटका)
माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर या साखर कारखान्याच्या ९० व्या गाळप हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे व एज्युकेशन सोसायटीचे संचालक रत्नदीप बोरावके यांच्याहस्ते आज बुधवारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे, होलटाईम डायरेक्टर सतीश गिरमे, संचालक राहुल गिरमे, मोहन लांडे, विशाल जाधव, निळकंठ भोंगळे, निखिल कुदळे, सतीश साबडे, सतेज पैठणकर, शुगरकेनचे व्हा. चेअरमन कपिल भोंगळे, एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चंद्रकांत जगताप, व्हा. चेअरमन प्रकाश गिरमे, सचिव ॲड. सचिन बधे, खजिनदार नितीन इनामके, संचालक अजय गिरमे, जयवंत चौरे, मनीष रासकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र गिरमे म्हणाले की, यंदाचा चालू गळीत हंगामाचा शुभारंभ १५ ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे. गेली ९० वर्ष माळीनगर साखर कारखाना अव्याहतपणे चालू आहे. परंतु, साखर कारखाना चालवणे म्हणजे एवढे सोपे नाही. कारखाना चालवत असताना राजकीय, सामाजिक व नैसर्गिक अडचणी येत असतात. पण कारखाना टिकणे व पुढे-पुढे जाणे, कारखाना मोठा होणे, हे खूप महत्त्वाचे आहे. देशातील साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. साखरेचे दर व साखरेचा वाढलेला उत्पादन खर्च आणि या उत्पादन खर्चातील कर्जाचे व्याज, कामगारांचा पगार आणि केमिकल खर्च या सर्व खर्चाचा परिणाम साखरेच्या मिळणाऱ्या फायद्यावर होतो. परिणामी कारखान्यांना तोटा सहन करावा लागतो. कारखाना कमी खर्चात व कमी वेळेत कसा चालेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करून साखर धंद्यात आपला कारखाना तोट्यात जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. कारखान्याच्या कामगारांना दिवाळीपूर्वी चांगला बोनस देण्यात येईल, असेही श्री. गिरमे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कारखान्याचे अधिकारी सिद्धेश्वर घोंगडे, अनिल दांडगे, वाघ, अनिल बनकर, सुरेश जगताप, रोहित जावळे, महेश गिरमे, संजय पांढरे, अनिल जाधव, महेश शिंदे, विराज कुदळे, सचिन कुदळे, विशाल बोरावके, सचिन टिळेकर, अविनाश गायकवाड, मनीष पांढरे, शार्दूल शिंदे, आण्णा कांबळे आदी कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng