Uncategorizedताज्या बातम्या

दिव्यांग तरुणीने पायाने टिळा लावून औक्षण केल्यानंतर उपमुख्यमंत्र्याचे डोळे पाणावले.

‘ताई, तू लढत राहा…’ तिने ओवाळलं अन् आपसूक उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांत आलं पाणी…

जळगाव (बारामती झटका)

‘आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे,’ हे उद्गार आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. जळगाव शहरात कार्यक्रमासाठी जात असताना देवेंद्र फडणवीस यांना ‘मनोबल’ या शाळेतील एका दिव्यांग मुलीनं पायाने ओवाळलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट करत तरुणीचे आभार मानले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जळगावातील दिव्यांग मुलांच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. यावेळी प्रकल्पाची पाहणी करुन मुलांशी संवाद साधला. प्रकल्प पाहणीवेळी एका दिव्यांग तरुणीने फडणवीसांना पायाने टिळा लावून औक्षण केलं. यावेळी फडणवीस यांनी तिचे आभार मानत या प्रसंगाने त्यांच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

जळगाव शहरात शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आला. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरातील दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या मनोबल या संस्थेला भेट दिली. मनोबल संस्थेची पाहणी केल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. याचवेळी दिव्यांग संस्थेतील एका तरुणीने देवेंद्र फडणवीस यांना ओवाळलं. तरुणीने पायाच्या अंगठ्याने ओवाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस भावूक होत ‘ताई तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत,’ असा आशीर्वाद दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक मंत्री तथा भाजप-शिवेसना पक्षाचे नेते उपस्थित होते. 

‘ताई, तू लढत राहा…आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” 

यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट लिहित ‘तरुणीचे कौतुक केले आहे. ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरुन मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्याने टिळा लावणाऱ्या, त्याच पायाने आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.” ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले. “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!” 

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort